चंद्रपूर : राज्यातील महानगरपालिकांत लागू केलेल्या स्थानिक संस्था कराला (एलबीटी)
विरोध सुरू असताना चंद्रपुरात मागील पाच महिन्यांत सुमारे १७ कोटी ८१ लाख ९० हजार १४२
रुपयांची विक्रमी करवसुली झाली आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये चंद्रपूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत
रूपांतर झाले. त्यानंतर मनपाची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच जुलै
२०१२ पासून शासनाने एलबीटी लागू केली. त्यामुळे व्यापा-यांनी विरोध दर्शविला. मुख्यमंत्र्यांनी
प्रारंभीच्या काही महिन्यांत सवलत दिल्यानंतर पुन्हा एलबीटी सुरू करण्यात आली. नोव्हेंबरपासून
एलबीटी लागू झाला. नोव्हेंबर २०१२ पासून मार्च २०१३ पर्यंत एकूण १७ कोटी ८१ लाख ९०
हजार १४२ रुपयांचा एलबीटी कर वसूल झाला आहे. सर्वाधिक एलबीटी कर ङ्केब्रुवारीत वसूल
झाला आहे. सुरुवातीला चांगलाच विरोध करणा-या व्यापा-यांनी आता एलबीटीला सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे.
३ हजार ३३ व्यापा-यांनी एलबीटीसाठी नोंदणी केली आहे. यादरम्यान एलबीटी चोरीच्या केवळ चार घटना उघडकीस
आल्या. नोंदणी प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे. एलबीटी वसुलीसाठी देवानंद कांबळे यांच्या
नेतृत्वात एकूण सहा जणांचे पथक कार्यरत आहे.
-------------------------
- २ कोटी १ लाख ९८ हजार ३४९-नोव्हेंबर १२
- २ कोटी ७९ लाख ३९ हजार ४८७ -डिसेंबर १२
- ३ कोटी २२ लाख ९३ हजार ४८६ - जानेवारी १३
- ७ कोटी १२ लाख ३४ हजार ८७३ - ङ्केब्रुवारी १३
- ३ कोटी ६५ लाख २३ हजार ९४१ - मार्च १३