সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, May 25, 2013

चंद्रपूर- 46.0 तापमान


चंद्रपूर- बुधवारपर्यंत विदर्भाला घट्ट पकडून असलेला उष्णतेच्या लाटेचा विळखा आता हळूहळू सैल होत आहे . गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही पाऱ्यात हलकी घसरण झाली . नागपूरपेक्षाही विक्रमी उच्चांक नोंदविणारा चंद्रपूरचा पारा तर नागपूरपेक्षाही कमी झाला आहे .शुक्रवारी 46.0 तापमान  होते  हा जरासा दिलासा नागरिकांना सुखावणारा ठरतो आहे . रात्रीच्याही तापमानात घट झाल्याने तोही दिलासा आहे .

विदर्भात मागील आठवड्यापासून ते बुधवारपर्यंत उष्णतेची लाट होती . चंद्रपूरचा पारा ४८ . २ अंशांपर्यंत पोहोचला तर नागपुरात पाऱ्याने सहा दशकांचा विक्रम मोडला होता . गुरुवारी तापमान ४६ . ६ अंशांवर आल्यानंतर शुक्रवारी त्यात आणखी घसरण झाली . नागपुरात ४६ . ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली . मात्र हे तापमान अद्यापही सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक आहे . विदर्भात चंद्रपूर , ब्रह्मपुरी आणि वर्धा वगळता अन्य ठिकाणी पाऱ्यात फारसा फरक पडलेला नाही . चंद्रपूरचा पारा ४६ अंशांवर आला . ब्रह्मपुरीचे तापमानही ४६ अंश आहे . सरासरीपेक्षा अधिक आहे . हीच स्थिती वर्धेत असून तेथे ४५ . ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली . याशिवाय गोंदियात ४५ . १ व अमरावतीमध्ये ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली . यवतमाळ , अकोला व वाशीममध्ये पारा जेमतेम ४२ अंशांदरम्यान आहे . ऊन जरा सुसह्य आहे .
चंद्रपूरमध्ये पारा ४७ ते ४८ अंशांपर्यंत गेला त्यावेळी रात्रदेखील उष्ण होती . रात्रीचे तापमान ३३ अंशांपर्यंत पोहोचले होते . गुरुवारी पाऱ्यात घसरण होताच रात्रदेखील हलकी थंड झाली . पाऱ्यात तब्बल पाच अंशांची घसरण होऊन तो २८ अंशांपर्यंत आला . यामुळे रात्रीच्या गरम झळांपासून हलका दिलासा मिळत आहे .
मेच्या अखेरच्या आठवड्यात ' नवतपा ' असतो . या दरम्यान सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो . यामुळे तापमानातील वाढ याचदरम्यान असल्याचे आजवर दिसून आले आहे . इतिहासात बहुतांश वेळा उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान अखेरच्या आठवड्यातच होते . यंदा हा ' नवतपा ' २५ मे ते ३ जूनदरम्यान आहे . दोन दिवसांपासून पाऱ्यात हळूहळू घसरण होत आहे . तर हवामान खात्यानेदेखील , उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जास्तीत जास्त दोन दिवसच कायम राहण्याचा अंदाज आहे . यानंतर महिनाअखेरपर्यंत पारा ४२ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता व्यक्त केली आहे . यामुळे यंदा ' नवतपा ' दरवर्षीसारखा तापणारच नाही , अशी चिन्हे आहेत .

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.