चंद्रपूर- जगप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांनी निर्माण केलेल्या मूल तालुक्यातील सोमनाथ प्रकल्पात १५ ते २२ मे या कालावधीत श्रमसंस्कार छावणीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरात समाजसेवक डॉ. विकास आमटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सोमनाथ प्रकल्पात नेहमीच नानाविध उपक्रम राबविण्यात येत असतात. येथे यापूर्वी ४६ श्रमसंस्कार शिबिरे झाली आहेत. सदर शिबिर हे ४७वे आहे. नवयुवकांत श्रमप्रतिष्ठा वाढावी व सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वाढावी, या उदात्त हेतुने समाजसेवक बाबा आमटे यांनी सोमनाथ प्रकल्पात श्रमसंस्कार छावणीला ४६ वर्षापुर्वी सुरुवात केली होती. तेव्हापासून दरवर्षी या शिबिरात देशभरातील युवा व नागरिक शेकडोच्या संख्येने सहभागी होतात. यावर्षी होणार्या या शिबिरात १८ ते ४५ या वयोगटातील ७0 महिलांसह ३५0 शिबिरार्थीचा समावेश आहे. शिबिरात सामाजिक आवड असणार्या लोकांनीच सहभागी व्हावे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी डॉ. विकास आमटे यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरूवात होत असून मेळघाटातील कुपोषणावर कार्य करणारे डॉ. आशिष सातव यांचे 'कुपोषण कसे टाळावे' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. यावेळी डॉ. शितल आमटे-करजगी, डॉ. कौस्तुभ आमटे आदींची उपस्थिती राहणार असल्याचे शिबिर प्रमुख संजय पेचे यांनी सांगितले.