সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, March 18, 2013

पांडुरंग जाधव याचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी


आदीवासीची जमीन हडपली  

जिवती - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे मानद सचिव तथा प्रांजली माध्यमिक विद्यालय नंदप्पा येथील संस्थापक पांडुरंग जाधव यांचेवर आदीवासीच्या जमीनीचे खोटे रेकार्ड बनविल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमिक एल्गारने तहसिलदार जिवती यांचेकडे केली आहे.
जिवती तालुक्यातील नंदप्पा या गावातील आदीवासी शेतकरी मोहपतराव मरसकोले यांना 1994 मध्ये स.नं.97/1 ही 2 एकर जमीन पट्टयात शासनाकडुन मिळाली. तेव्हापासुन सदर आदीवासीचा कब्जा असुन पिक घेत आहे. मरसकोले हा अशिक्षीत आदीवासी असल्याचा फायदा घेत पांडुरंग जाधव याने सदर जमीनीचा सन 2000 मध्ये सातबारा आपली पत्नी यशोदा पांडुरंग जाधव (जि शासकीय रूग्णालय गडचांदुर येथे परीचारीका पदावर आहे) हया नावाने बनवुन घेतला. त्याच सातबाÚयाचा फायदा घेत प्रांजली माध्यमिक शाळेची इमारतीचे बांधकाम केले. रेकार्ड बदलल्याची कुणकुण आदीवासीला  लागुच दिली नाही. यावर्षी दुष्काळी अनुदानाची रक्कम यशोदा जाधवचे नावाने आल्यामुळे ही बाब उजेडात आली. परंतु माझे पत्नीचे नावाने पट्टा मिळाल्याची तोंडी माहीती देवु लागला. या प्रकरणाची माहीती श्रमिक एल्गारचे  विभागीय सचिव घनश्याम मेश्राम यांनी माहीती घेतली असता यशोदाचे नावाने कोणताही पट्टा नसल्याचे व फेरफार पत्रकातही फेरफाराची कोणतीही नोंद नसल्याचे उघड झाले. त्यामुळे शासकीय रेकाॅर्डमध्ये खोडतोड करून शासनाची दिशाभुल करणारे पांडुरंग जाधव, यशोदा जाधव व संबंधीतावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी श्रमिक एल्गारचे विभागीय सचिव घनश्याम मेश्राम यांनी तहसिलदार जिवती व उपविभागीय अधिकारी राजुरा यांचेकडे केली आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.