गडचिरोली र्शमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ व ७ एप्रिल २0१३ रोजी पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत 'वृत्तलेखन - मांडणी आणि भाषा', 'जनसंपर्क- महत्त्व आणि गरज', अर्थसंकल्पाचे वेिषण पत्रकारिता आणि कायदे, तणाव व्यवस्थापन, मुद्रित शोधन आणि शुद्धलेखन या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आजच्या पत्रकारितेत शहरी आणि ग्रामीण बातम्यांचे महत्त्व आणि बदललेले स्वरूप लक्षात घेऊन त्यांचे ज्ञान अद्ययावत करण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणार्या या कार्यशाळेत भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली. सहभागी प्रतिनिधींची र्मयादित संख्या १00 आहे. नोंदणी शुल्क १00 रुपये ठेवण्यात आले आहे. नोंदणी ३१ मार्चपर्यंत इच्छुक पत्रकारांनी चंद्रपूर येथील र्शमिक पत्रकारसंघाच्या कार्यालयात करावी. उद््घाटन ६ एप्रिल रोजी सकाळी १0 वाजता होणार असून, समारोपीय कार्यक्रम ७ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३0 वाजता होईल. सहभागी सर्व पत्रकारांना प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. नोंदणी करण्याचे आवाहन चंद्रपूर-गडचिरोली र्शमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हनूगूंद, सचिव संजय तुकराम, जिल्हा महिती अधिकारी रवी गिते यांनी केले आहे. |
Sunday, March 24, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য