भागातील नागरीकांना मिळणार विज कनेक्शन
जिल्हा नियोजन मधून 70 लाखाची तरतूद
चंद्रपूर दि.04- चंद्रपूर शहराच्या मध्यभागी
विकोलीच्या जागेवर वसलेल्या चांदा रैय्यतवारी भागातील नागरीकांना पालकमंत्री संजय
देवतळे यांच्या पुढाकाराने विद्युत कनेक्शन मिळणार असून यासाठी जिल्हा नियोजन मधून
यावर्षी 40 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरीत तरतूद पुढील वर्षीच्या जिल्हा
नियोजनमधून करण्यात येणार आहे. येथील
नागरीकांना लवकरात लवकर विद्युत कनेक्शन देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी महावितरणला दिल्याने येथील नागरीकांचे 25
वर्षापासूनची हक्काच्या विद्युत मिटरची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे.
वेकोलीच्या
जागेवर सुमारे 25 वर्षापासून शेकडो कुटूंब राहत आहेत. येथील नागरीकांना हक्काचे
विद्युत मिटर नसल्यामुळे वेकोलीच्या विद्युत तारावरुन वीज घेतल्या जात होती. या तारा व खांब जुने झाल्यामुळे येथील वस्तीत
विद्युत अपघात होण्याची शक्यता आहे.
अलिकडेच वेकोलीने सकाळी 6 ते रात्रो 9 दरम्यान विद्युत पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने येथील रहिवाश्यांची
प्रचंड गैरसोय झाली आहे.
येथील
रहिवाश्यांनी व येथील वेकोलीच्या अधिका-यांना महाविरण कंपनीला वैध विद्युत पुरवठा
देण्याची विनंती केली. परंतु जमिनीचा
मालकी हक्क वेकोलीकडे असल्यामुळे महावितरणने विद्युत पुरवठा करण्यासाठी वेकोलीचे
नाहरकत प्रमाणपत्र व प्रस्तावित खर्च 70 लाख रुपयाची व्यवस्था करण्यास
सांगितले. वेकोलीने हा प्रस्ताव मान्य
केला नाही.
ही बाब पालकमंत्री संजय देतवळे यांचे निदर्शनास आली असता चांदा रैय्यतवारी
वसाहतीत जिल्हा विकास योजनेमधून महावितरणला निधी देण्याचे व
वेकोली आणि महावितरण यांची संयुक्त बैठक घेवून याबाबत तोडगा काढण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांना दिले.
त्याप्रमाणे 22 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात
आली.
त्यावेळी चांदा
रैय्यतवारी येथील इतर नागरी सुविधांचा विचार करता वीज पुरवठया व्यतिरीक्त इतर सर्व
नागरी सोयी त्या भागात पुरविण्यात आल्याचे दिसून आले. तसेच वेकोलीने येथील
रहिवाश्यांवर अतिक्रमणाच्या अनुषंगाने काहीच कार्यवाही केल्याचे दिसून आले
नाही. मात्र अवैध वीज कनेक्शनमुळे अपघात
घडून जिवीत तसेच वित्तीय हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही बाब पुढे आली. त्यावर
महावितरणने येथील नागरीकांनी दोनशे रुपयाच्या प्रतिज्ञापत्रावर करार नामा करुन
दिल्यास वीज पुरवठा करता येईल असे सांगितले.
त्यासाठी जिल्हा नियोजनमधून अतिरीक्त निधीची मागणी केली. ही मागणी पालकमंत्री
व जिल्हाधिकारी यांनी मान्य करुन जिल्हा नियोजन मधून यासाठी 70 लाखाची तरतूद
केली.
यामुळे येथील नागरीकांच्या घरात लवकरच हक्काचे विद्युत मिटर बसणार
असून शाळकरी मुलांचा अभ्यास आणि वाढती गरमी याचा विचार करुन पालकमंत्री संजय
देवतळे यांनी निर्णय घेवून चांदा रैय्यतवारी भागातील नागरीकांना दिलासा दिला
आहे.