সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, March 15, 2013

मुक्तेश्वरी गुरुपीठ जगद्विख्यात विद्यापीठ व्हावे


वर्धा, १४ मार्च
भारतीय संस्कृतीत गुरुतत्त्व महत्त्वाचे आहे.अमेरिकेने जर्मनी-जपानला मागे टाकून बलाढ्यसत्ता बनविली. अग्रगण्य देशात अमेरिका, चीननंतर भारताचा क्रमांक आहे. माझा छोट्या खेड्यातजन्म झाला तेव्हा भारत सर्वात गरीब देश होता.१९६५ नंतर भारताचा जगात तिसरा क्रम लागतो. भारतात अकराव्या शतकापासून अनेक आक्रमणेझाली तरी भारतातील गुरुपीठे स्वत:चे अस्तित्त्वटिकवून होते. २०४० पर्यंत भारत चीनला मागेटाकेल. भारत महासत्ता होईल तसेच सद्गुरू वसंतघोंगे (प्रियानंद) महाराजांचे स्वप्न आहे की २०४७मध्ये जेव्हा स्वातंत्र्याची शताब्दी साजरी केलीजाईल तेव्हा याच मुक्तेश्वरी गुरुपीठाच्याव्यासपीठावरून भारत जगद्गुरू झाल्याची घोषणासुद्धा करता येईल, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ.विजय भटकर यांनी केले.


निमगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त घोंगे महाराजयांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले होते. त्या कार्यक्रमात  बोलत होते.Ÿडॉ. भटकर पुढे म्हणाले, आज अर्थव्यवस्थाविकासाच्या संदर्भात भारताचा तिसरा क्रमांकआहे. मात्र, नॅशनल इंटेलिजेंस रिपोर्टचे अवलोकनकेले असता त्यामध्ये केलेल्या भाकितानुसार२०३० मध्ये चीन अमेरिकेला मागे टाकेल.अत्युच्च कोटीचे ज्ञान जे कुठेही नाही असे ज्ञानभारतातील गुरुपीठ तयार करेल तेव्हा बाहेरदेशातील लोक भारतात येऊन शिकतील. अध्यात्मव विज्ञानाचा संगम या ठिकाणी राहील. भारतामध्येअशी महान वैश्विक गुरुपीठे तयार व्हायला पाहिजेजिथे लोक खरया अर्थाने मुक्ती म्हणजेच इटर्नलफ्रीडम प्राप्त करण्याची दीक्षा म्हणजेच खरे ज्ञानप्राप्त होण्याची दीक्षा आपल्याला मिळेल. प्रियानंद महाराज अशी दीक्षा देण्याचे कार्यगेल्या ५२ वर्षांपासून करीत आहेत. त्यामुळेमुक्तेश्वरी गुरुपीठ इथे हेच कार्य पुढे चालावे, असेते म्हणाले.या ध्यान शिबिरामध्ये वसंत घोंगे (प्रियानंद)महाराज यांनी ध्यान साधनेचे महत्त्व विशद केले.साधनेतूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो,असे घोंगे महाराज यांनी सांगितले.या महाशिवरात्री उत्सवामध्ये सद्गुरू प्रियानंदमहाराज यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन शांती सोहळ्याचेआयोजन करण्यात आले होते. यावेळी पद्मश्री डॉ.विजय भटकर यांना समाजभूषण पुरस्कारानेसन्मानित करण्यात आले.
\
 



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.