সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, March 17, 2013

4१ लाख चोरी- दोन आरोपींना अटक


चंद्रपूर: माढेळी या छोट्याशा गावातील कापड व्यापारी आणि जिनिंग मिल मालक सुभाष मुथा यांच्यावर घरावर सशस्त्र दरोडा घालून, तब्बल दीड किलो सोने आणि ४१  लाखांची रोकड लंपास केली होती. यथील दोन आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे 
मुथा यांच्या घरावर ७ ते ८ जणांनी दरोडा घातला. दरोडेखोरांनी रखवालदाराला मारहाण आणि पिस्तुलचा धाक दाखवून त्याला बांधलं. त्यानंतर दरोडेखोरांनी घराचे दर्शनी दार तोडून घरात शिरले आणि डल्ला मारला. विशेष म्हणजे हा प्रकार सुरू असताना,  मुथा परिवारापैकी कुणीही झोपेतून उठले नाही. दरोडेखोरांनी आरामात आपला कार्यभाग आटोपून पळ काढला. त्यांनी आपल्या सोबत सुमारे दीड किलो सोने, ४१  लाख रुपयाची रोकड लंपास केल्याचं, एफ.आय.आर मध्ये नोंदविण्यात आला. रखवालदाराने स्वतःला कसेबसे सोडवून घेत घरमालक मुथा यांना उठविताच हा प्रकार लक्षात आला. पोलिस पथकासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपास सुरू केला. यात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.