সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, December 01, 2017

ब्रम्हपुरी येथे ऑल इंडिया ओपन बुद्धिबळ स्पर्धा

ब्रम्हपुरी- ब्रम्हपुरी एज्युकेशनल सिटी ट्रॉफी ऑल इंडिया ओपन फेडरेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विठ्ठल रुक्मिणी सभागृहात होणाऱ्या या स्पर्धेच उद्घाटन आज  १/१२/२०१७ ला दुपारी १:०० वाजता उदघाटन झाले. विविध राज्यातील ११० राज्यातील स्पर्धकानी  प्रवेश नोंदविला आहे. ब्रम्हपुरीतील अनूक्रमे विक्रांत चोले,  निलेश बांडे , रितेश उरकुडे, ओमकार रासेकर,  निषाद खोब्रागडे, वेदांत बांडे, कुमुदीनी बारसागडे ऐश्वर्या बावनकुळे, जुबेर रैय्यानी, आदित्य तलमले व हरीक्रिष्ण सरकार हे खेळाडू देशातील इतर खेळाडूंना ब्रम्हपुरी तर्फे आवाहन देणार आहेत.
ब्रम्हपुरी येथील होणारी विदर्भातील ही सर्वात मोठी मान्यता प्राप्त स्पर्धा असून या करीता प्रा. शुभाष बजाज यांचे अध्यक्षतेखाली स्वागत समिति तयार करण्यात आलेली आहे. नारायण राऊत बोकडे,  प्राचार्य डॉ. देवीदासजी जगनाडे,  डॉ. प्रेमलाल मेश्राम व अँड. गोविंदराव भेँडारकर हे स्वागत समिति चे अध्यक्ष आहेत.
या स्पर्धेत एक लाख पन्नास हजार रुपयांची रोख पारितोषीके असून प्रथम रोख पुरस्कार पंचवीस हजार रुपये आहे.याशिवाय साठ खेळाडून टॉफी पुरस्कार देण्यात येणार आहेत. सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे मुख्य आश्रयदाते श्री.मा.अशोक भैया,  प्राध्यापक अतुलभाऊ देशकर , श्री.निलेश मोहोता, डॉ.खिजेंद्र गेडाम, डॉ.जी.एन.मेश्राम , श्री.शुभाषराव ठवरे,  कादर मॅथ्थू निरप्पे ल,  डॉ.लक्ष्मीकांत लाडुकर, श्री.पंचमजी आकरे , श्री.वसंतरावजी कावळे , श्री.रामावतार अग्रवाल, श्री शुभाष अग्रवाल, श्री.शरदराव उराडे , श्री.धनेशजी अग्रवाल, श्री.बंडुभाऊ बांगरे, श्री.राजेश जाजु, श्री रवि लोखंडे , श्री सूखदेव प्रधान , श्री.सारंगभाऊ बनपूरकर,  प्रकाशभाऊ बगमारे,  रंजना चोले.श्री.नंदुजी पिलारे , डॉ.माणिक  खुने व डॉ.राजकुमार लोकरे हे आहेत. ब्रम्ह्पुरी तालुका बुद्धिबळ संघटनेचे सर्व सदस्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नाचे पराकाष्ठा करीत आहेत

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.