সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, December 01, 2017

हसनबाग तिहेरी खुनातील सर्व सातही आरोपी निर्दोष

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हसनबाग भागात स्कॉर्पिओ वारंवार अंगावर घालून तिघांचे खून केल्याचा आरोप असलेल्या सात आरोपींची मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्यांच्या अभावी संशयाचा लाभ देत निर्दोष सुटका केली.
जगदीश विठ्ठल कोसूरकर, दिलीप विठ्ठल कोसूरकर दोन्ही रा. छापरूनगर, रॉबीन राहुल बोरकर, गणेश ऊर्फ गोल्डी जन्मोजय कुटे, दीपक ऊर्फ मुन्ना बालकदास गिले, रवी सदानंद खोब्रागडे आणि तुषार ऊर्फ दद्दू छोटुजी लोणारे, अशी आरोपींची नावे आहेत. रशीदखान जसीमखान, अब्दुल बेग आणि रोहित नारनवरे, अशी मृताची नावे होती.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, हिवरीनगर येथील कुख्यात गुन्हेगार राहुल चेपट्या हा २० जून २०१४ रोजी आपल्या साथीदारांना सोबत घेऊन सक्करदरा तलावाजवळील हॉटेल बॉलिवूड सेंटर पॉर्इंट येथे कुख्यात गज्जू वंजारी याच्या लग्न संमारंभात गेला होता. या ठिकाणी चेपट्यासोबत जगदीश कोसूरकर आणि त्याच्या साथीदारांनी भांडण केले होते. आरोपींनी चपट्यावर तलवार, चाकू आणि सुरी उगारून दगडफेक केली होती. चेपट्यासोबत असलेले जुना बगडगंज भागातील प्रदीप भारत घोडे, रशीदखान, अब्दुल बेग आणि रोहित नारनवरे, असे चौघे जण फ्रिडम मोटरसायकलने पळून जात असता आरोपींनी त्यांचा स्कॉर्पिओने पाठलाग सुरू केला होता. हसनबाग भागात आरोपींनी स्कॉर्पिओ राँगसाईड घेत मोटरसायकलवर धडकवली होती. मोटरसायकल चालवीत असलेला प्रदीप घोडे हा पळून गेला होता. तर उर्वरित तिघे स्कॉर्पिओच्या धडकेने ठार झाले होते.
प्रदीप घोडे याच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी प्रारंभी भादंविच्या ३०२, ३०७, १२० (ब), २०१, १४१, १४३, १४४, १४८, १४९, ५०६(ब), शस्त्र कायद्याच्या ४/२५, मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पुढे या आरोपींविरुद्ध महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली होती. केवळ सात आरोपी पोलिसांच्या हाती लागले होते. उर्वरित अखेरपर्यंत फरार राहिले. सहाय्यक पोलीस आयुक्त टी. डी. गौंड यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात साक्षीपुराव्यादरम्यान महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले होते. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर. के. तिवारी, अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगावकर, अ‍ॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.