সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, December 10, 2017

मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवपदी योगेश कोरडे यांची निवड


तालुका पत्रकार संघाकडून सत्कार

कळमेश्वर/ प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या सन २०१७ ते २०१९ च्या नवीन कार्यकारिणीमधे कळमेश्वर येथील युवा पत्रकार योगेश कोरडे यांची नागपूर विभागीय सचिव पदावर निवड करण्यात आली. त्यामुळे कळमेश्वर तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक शासकीय विश्राम गृह येथे कोरडे यांचा सत्कार करण्यात आला.
      मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच प्रेस क्लब मुंबई येथे पार पडली.या बैठ्कीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष सिद्धधार्थ शर्मा हे होते तर परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,किरण नाईक,गजानन नाईक,अनिल महाजन हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी राज्यातील विविध पदांची घोषणा करण्यात आली.या मध्ये नागपुर विभागीय सचिव या पदावर कळमेश्वर येथील पत्रकार योगेश कोरडे यांची निवड करण्यात आली.या निवडीकरिता आज कळमेश्वर तालुका पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकित योगेश कोरडे यांचा सत्कार करण्यात आला.व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते मनोहर कुंभारे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर श्रीखंडे, तालुकाध्यक्ष राहुल अंजनकर, सचिव चंद्रकांत श्रीखंडे, अरविंद ढोले, डाॅ. संदीप भुयार, मनीष गोतमारे, मुशीर सय्यद, युवराज मेश्राम,योगेश भुसारी, गणेश बराने, सुधाकर गावंडे, माजी पं.स. सभापती वैभव घोंगे होते.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.