चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष व उमेदवार यांच्याकडून होणाऱ्या खर्चावर चोख लक्ष ठेवण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक बी.के. मीना यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृह येथे रविवारी आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. मीना बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस. डहाळकर, उपविभागीय अधिकारी दीपा मुधोळ व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दामोधर नान्हे यावेळी उपस्थित होते.
सहाय्यक निवडणूक अधिकारी व निवडणूक नोडल अधिकारी यांची निवडणूक खर्चाबाबत विशेष बैठक श्री. मीना यांनी घेतली. जिल्हास्तरीय निवडणूक खर्च कक्षाशी सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी समन्वय ठेवून दररोज होणाऱ्या खर्चाचा आढावा सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या सभा, रॅली व बैठका यांचाही आढावा सादर करण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी म्हणाले, सभा, रॅली व बैठका पूर्व परवानगीशिवाय होत असल्यास कारवाई करा. स्थानिक स्तरावर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांमधील तसेच केबलवरील जाहिरातींवर नियंत्रण ठेवा. सभा, रॅली व बैठकांचे नियमित चित्रीकरण करुन ते सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वत: पहावे व तसा अहवाल पाठवावा. कुठलेही वाहन विनापरवानगीने फिरणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रत्येक उमेदवाराच्या शॅडो खर्चाचे रजिस्टर ठेवून खर्च स्त्रोतावर लक्ष ठेवावे.