मैत्रेय फाऊन्डेशन
नागपूर : अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे
महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत तर विदर्भातील शेतक-याची दैनावस्था
त्याहून भयावह आहे. ही जाणीव ठेऊन मैत्रेय फाऊन्डेशन तर्फे शेतक-यांना मदत करता यावी याकरिता मैत्रेय
फाऊन्डेशन ने अकोला मधील मनाडी हे गाव तर यवतमाळ मधील मूंडल हे गाव दत्तक घेतले
आहे. या दोन्ही गावातील एकूण 100 कुटूंबांना दत्तक घेतले आहेत. या कुटूंबांना
प्रत्येकी 3 दुभत्या शेळ्या देण्यात येणार आहेत. तर शेतक-यांच्या कल्याणार्थ विविध
उपक्रम आणि अनेक योजना राबविण्याचा मैत्रेय फाऊन्डेशनचा मानस आहे. दत्तक योजनेचा
शुभारंभ कार्यक्रम अकोल्यातील मनाडी येथे 26 मार्च 14 ला 40 कुटूंबांना तर, यवतमाळ
मधील मूडल येथे 28 मार्च रोजी 60 कुटूंबांना होणार आहे. कार्यक्रमाला मैत्रेय
इऊन्डेशनच्या संचालिका वर्षा सत्पाळकर उपस्थित राहणार आहे.