चंद्रपूर, लोकसभा निवडणूकीसाठी लागणा-या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी देण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर यांच्या काङ्र्मालयात सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या कक्षाचे कामकाज सुरू झाले आहे.
निवडणूक आयोगाने निवडणूकीची कामे सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हास्तरावर एक खिडकी योजना सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार चंद्रपूर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांच्या नेतृत्वात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत विविध विभागाचे आठ अधिकारी नेमण्यात आले आहेत. राजकीय पक्षाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी निवडणूकीसाठी लागणाèया परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यादरम्यान निवडणूक आयोगाने एक खिडकी योजना सुरू करण्याचे निर्देश दिले. या कक्षात सहाय्यक मोटार निरीक्षक सुहास कट्टे, राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता नगराळे, महानगरपालिकेचे शहर अभियंता बारई, जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक अकबर अली, आरोग्य विभागाचे एन. बी. ङ्कुलझेले इत्यादींची यावेळी नेमणूक करण्यात आली आहे.