होळी व धुळवड चंद्रपूर जिल्ह्यासाठी काळ ठरली. जिल्हात विविध घटनात एकूण
१६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ५ अल्पवयीन मुले तर एका शेतक-याचा समावेश
आहे.
१) .
भद्रावती शहरातील शिवाजीनगर भागात राहणारे ३ युवक रंगपंचमीनिमित्त रंग
खेळून शहरालगतच्या चारगाव येथील वर्धा नदीवर स्नानांसाठी गेले असता त्यांचा
खोल पाण्यात बुडून करून अंत झाला आहे. यात भद्रावतीच्या ग्रामीण
रुग्णालयातील तरुण डॉक्टर संजय राजूरकर-३० यांचा समावेश आहे. डॉ. राजूरकर
यांचा काहीच दिवसांआधी साखरपुडा झाला होता. तर त्यांचे मित्र औषध
व्यावसायिक मित्र ओंकार वघळे-२९ व शुभम ठाकरे-२० यांचा अन्य मृतांमध्ये
समावेश आहे.
२) चंद्रपूर
जिल्ह्यातील मुल शहरात रंगपंचमी आटोपून उमा नदीवर स्नानासाठी भरधाव वेगाने
निघालेल्या दुचाकीची समोरून येणा-या अन्य दुचाकीशी थेट धडक झाल्याने
चौघांचा जागीच मृत्यू झाला. चौघेही मुल शहरातील रहिवासी आहेत सुरज रणदिवे
-२७, अक्षय खोब्रागडे-१९, अजय येडनुत्तलवार-३७, व गणेश गंधेवार यांचा
मृतांमध्ये समावेश आहे.
३)
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात नेरी येथे मद्यपि मामा आटो चालवीत
असताना नियंत्रण उलटून आटोतील आदित्य अनिल नगराळे -५ या चिमुकल्याचा आटोत
अडकून मृत्यू झाला.
४)
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात पैनगंगा नदीवर स्नानासाठी गेलेल्या
निलेश विभूतीवार नामक १७ वर्षीय युवकाचा नदीत बुडून मृत्यू झालाय
५)
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात मद्यपि पतीच्या
जाचाला कंटाळून पत्नी भारती सुरनकर हिने श्रावणी ६ व शिवम-५ या मुलांसह
विहिरीत उडी घेतली. यात भारती बचावली तर २ चिमुकल्यांचा अंत झालाय.
६)
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा गावात शेतात असलेल्या
विहिरीत पाणी आणण्यासाठी गेलेल्या लोकेश मुशेट्टी-१२ व अनुराग उमक -७ यांचा
बुडून मृत्यू
७)
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बोरगाव येथे अभिमान काळे -५५ या
कर्जबाजारी शेतक-याची नापिकीला कंटाळून शेतातच गळफास लावून घेत आत्महत्या
८)
चंद्रपूर शहरालगतच्या विसापूर येथे भरधाव वेगाने जाणा-या दुचाकीवरील मनोज
धुर्वे-३० याची वाहन नियंत्रण सुटून दुचाकी उलटल्याने मृत्यू
९)
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील पेंढरी तलावात गुरे धुण्यासाठी
गेलेल्या संभाजी लोडगे -५५ या महादवाडी निवासी शेतक-याचा तलावातील गाळात
फसून मृत्यू
|
||
Wednesday, March 19, 2014
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য