लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिलेल्या माहितीनुसार भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे विदर्भातील लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले. आम आदमीचा पक्ष घेऊन लढू बघणाऱ्या आपच्या उमेदवार अंजली दमानिया यांच्या परिवाराकडे तब्बल १९ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले.
निवडणुकीच्या मैदानातील बड्या पक्षाचे सगळेच उमेदवार कोट्यधीशच असल्याची माहिती शनिवारी सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांतून समोर आली. सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत, भाजपचे नितीन गडकरी. त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेसह त्यांची संपत्ती २० कोटी २३ लाख इतकी आहे.
त्यांची श्रीमंती स्पष्ट झाली आहे. गडकरी यांच्याकडे २४ हजार ५०० रुपये इतकी रोख रक्कम आहे. बँक आणि वित्तीय संस्थेतील त्यांची गुंतवणूक २१ लाख, त्यांच्या पत्नीची १७ लाख इतकी आहे. धापेवाडा येथील शेती, महालातील घर, मुंबईतील फ्लॅट मिळून त्यांची संपत्ती २० कोटींच्या घरात जाते. पैकी २ कोटी ५२ लाख चल संपत्ती आहे, ६ कोटी ५८ लाख अचल तर पारंपरिक पध्दतीने आलेल्या मालमत्तेची किंमत ७ कोटी ८८ लाख आहे. अंजली दमानिया यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या परिवाराची चल संपत्ती ५ कोटी ६७ लाख तर अचल संपत्ती १३ कोटी ६३ लाख इतकी आहे. दमानियांकडे २५ हजार रुपये रोकड आहे. कर्जत, महागाव येथे शेतजमीन आहे. मुंबईतील गोरेगाव येथे फ्लॅट आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी. गडकरींची संपत्ती वडिलोपार्जित मालमत्तेसह 20 कोटींहून अधिक आहे.
नितीन गडकरींची संपत्ती
- मुंबईत फ्लॅट – 3 कोटी 87 लाख रुपये(सध्याची किंमत)
- 86 लाख रुपये किमतीचे दागिने
- हिंदू अविभक्त कायद्यानुसार परिवाराची संपत्ती - 59 लाख 87 हजार रुपये
- पत्नी कांचन गडकरीं यांच्याकडे 63 लाख 88 हजार रुपये किमतीचे दागिने
- पोस्टल आणि एलआयसीमध्ये गुंतवणूक -1 लाख 55 हजार रुपये
- पत्नीच्या नावे पोस्टल आणि एलआयसीमध्ये गुंतवणूक - 12 लाख 5 हजार रुपये
- शेअर्समध्ये गुंतवणूक - 14 लाख 89 हजार रुपये
- बँकांमध्ये असलेली शिल्लक - 21 लाख 18 हजार
- रोख रक्कम - 24 हजार 500 रुपये
- व्यावसायिक गुंतवणूक - 11 लाख 86 हजार
- पत्नीच्या नावे व्यावसायिक गुंतवणूक - 18 लाख 40 हजार