गडचिरोली- गुजरात मॉडेल'पेक्षा महाराष्ट्राच्या विकासाचे मॉडेल अधिक पटीने चांगले आहे, गडचिरोलीतील आदिवासींना शिक्षण सुविधा देवू असे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) येथे म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "देशात सध्या गुजरातच्या विकासाचे मार्केटिंग सुरू आहे. परंतु, 'गुजरात मॉडेल'पेक्षा महाराष्ट्राचे विकासाचे मॉडेल अधिक चांगले आहे. महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीची टक्केवारी गुजरातपेक्षाही अधिक असून, महाराष्ट्राची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.'
सन 2004 व 2009 मध्ये नागरिकांनी 'भाजप'च्या मार्केटींगचा फुगा फोडला आहे. यावेळीही नागरिक नक्कीच 'भाजप'च्या सध्या सुरू असलेला 'गुजरात मॉडेल'चा फुगा फोडून कॉंग्रेसला पसंती देतील, असा विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. कॉंग्रेसने 'मनरेगा' सारखी महत्त्वपूर्ण योजना राबवून खेड्यातील गरीब जनतेचे रोजगाराचे प्रश्ने सोडविले. मात्र, दुसरीकडे 'भाजप'कडून विकासाच्या नावे जनतेच्या डोळ्यात धूळफेक सुरू आहे.'