मैत्रेयच्या पुढाकाराने मनाडीवासीयांना
उदरनिर्वाहासाठी मिळाल्या हक्काच्या शेळ्या
अकोला - अकोल्यापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असलेले मनाडी गाव स्वातंत्र्याच्या साठ वर्षाच्या काळानंतरही मुलभूत सोयीसुविधांपासून उपेक्षीतच असावे ही खरोखरच शोकांतीकाच म्हणावी. त्यातच यंदाच्या गारपीटीने शेतक-यांना मोठं नुकसान भोगावं लागतंय. गारपीटीत अनेक जनावरे, कोंबळ्या, शेळ्यांचा जीव गेला. अनेक समस्यांना सामोरे जाणा-या या गावाची मुलभूत गरज ओळखून मैत्रेय फाऊन्डेशन, समन्वयीत कृषी विकास प्रकल्प आणि छखथउधऊ नागपूर यांच्या पुढाकाराने अकोल्यातील मनाडीवासीयांना दुभत्या शेळ्या अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गावात एकूण चाळीस कुटूंबांचे वास्तव्य आहे. येथे ना पाण्याची सोय, ना शाळा, ना पक्की घरे. शेतमजूरी करणारी ही कुटूंब कसाबसा दिवस काढत जगतात. आधूनिक भारतातील या गावाची ही हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन मैत्रेय फाऊन्डेशनने हे गाव दत्तक घेतले आहे. या दत्तक योजनेच्या शुभारंभी गावातील प्रत्येक कुटूंबाला तीन दुभत्या शेळ्या देण्यात आल्यात. प्रत्येक शेळीचा विमा काढलेला
आहे. तसेच दहा दिवसात शेळी अनावधानाने का असेना मरण पावली तर त्या बदली दुसरी शेळी त्या कुटूंबाला देण्यात येईल. दत्तक योजनेचा शुभारंभ कार्यक्रम काल दि. २६ मार्च रोजी मनाडी येथे झाला. कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महमंडळचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, अकोला जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक प्रशांत गावंडे, मैत्रेय फाऊन्डेशनच्या प्रतिनिधी अनिता खुडे, पत्रकार सुर्यकांत
भारतीय यांनी यावेळी गावक-यांना मार्गदर्शन केले. चाळीस कुटूंबाच्या या गावी प्रत्येक कुटूंबाला तीन शेळ्या देण्यात आल्या. अशा एकशे वीस शेळ्यांचे वाटप करण्यात आले. गावातील प्रत्येक
कुटूंबातील स्त्री ही वेगवेगळ्या बचतगटाला जुडलेली आहे. बचतगटातील महिलेनीच त्यांची ही गरज स्थानीक अधिका-यांकडे व्यक्त केली आणि मैत्रेय फाऊन्डेशन आणि स्थानिक अधिका-यांच्या पुढाकाराने गावक-यांना त्यांच्या हक्काच्या मुलभूत सुविधा पुरविण्याचे योजले.गावाची एकूण पकरिस्थिती लक्षात घेऊन शेळी पालन व्यवसाय मनाडीवासीयांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा आहे असे दिसते. मनाडी गावातील प्रमिला वासुदेव इंगळे यांचा नवरा शेतमजुरी करतो. कसंबसं दोन वेळची भ्रांतही निघणं कठीण. परंतू जवळ असलेल्या दोन शेळ्यांमुळे त्यांना थोडीशी मदत झाली. प्रमिलातार्इंनी शेळ्यांच्या सहाय्यानेच मुलीचं लग्न, मोठ्या मुलाचं डी एड आणि लहान मुलाचही शिक्षण त्या करू शकत आहेत. दोन्ही मुलं विज्ञान शाखेतून दरवर्षी प्रथम येण्याचाच मान पटकावित आलेत. लहान अमर सध्या १२ वी ला शिकतोय
पुढे त्याला उच्च शिक्षणं घेण्याचं स्वप्न आहे मात्र परिस्थितीने त्याचा तो स्वप्न पाहण्याचाही अधिकार हिरावून घेतलाय. शासनाकडे त्याने मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. कार्यक्रमाला समस्त गावकरी, मैत्रेयचे चंद्रकांत सानप शेगाव, अमोल बैस इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.