সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, February 09, 2018

वाहतूक पोलिसाचा प्रामाणिकपणा ;हरविलेला महागडा मोबाईल केला परत

 चंद्रपूर(ललित लांजेवार):
वाहतूक पोलीस हा कायमचा साऱ्यांच्या टिकेचा धनी. त्याने शिस्त दाखवली तरी त्याच्यावर टीका आणि त्याने कोणावर कारवाई न करता सोडून दिले तरी त्याने चिरीमिरी घेतल्याची टीका. पण वाहतूक पोलीसही माणसेच असतात आणि अनेक प्रसंगात त्यांची माणुसकी, त्यांचा प्रामाणिकपणा त्यांच्या कार्यातून दिसुन येतो.असाच एक प्रमानिकतेचा परिचय चंद्रपूर येथे वाहतूक पोलिसाने समाजापुढे आणला आहे. 

मंगळवारी चंद्रपूर येथील जटपुरा गेट येथे अमरदीप दिलीप निमसकार वय १८ वर्षे या महाविध्यालयीन विद्यार्थ्याचा ७ हजार किमतीचा मोबाईल जटपुरा गेट परिसरात हरविला. हा हरवलेला मोबाईलचा शोध हा विध्यार्थी घेत होता. तितक्यातच त्या ठिकाणी चंद्रपूर वाहतूक पोलिसातील सहाय्यक वाहतूक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र तुमसरे यांना हा  मोबाईल मिळाला.तुमसरे हे  जटपुरा गेट  कर्तव्य बजावत होते, त्यांना हा हरविला मोबाईल मिळाला.त्यांनी हा मोबाईल आपल्या जवळ ठेऊन घेतला.अमरदीप दिलीप निमसकार हा आपला हरविलेला मोबाईल  विरुद्ध दिशेने शोधत येत होता.तितक्यात सहाय्यक वाहतूक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र तुमसरे यांचे त्या मुलावर लक्ष पडले. त्यांनी त्याला विचारले असता तो आपला हरविलेला मोबाईल शोधात असल्याचे सांगितले.मुलगा हा गरीब घरचा असल्याने पैश्याची जमवाजमव करून घेतलेला मोबाईल अचानक हरविल्याने तो घाबरून गेला होता.  नरेंद्र तुमसरे यांनी त्याला पाणी पाजून शांत करत आपल्या खिश्यात असेलेला मोबाईल काढून दाखवला. मोबाईल बघताच  घाबरलेला मुलगा शांत झाला. त्यानंतर त्याची संपूर्ण चौकशी करून वाहतूक पोलीस नरेंद्र तुमसरे यांनी त्या मुलाला मोबाईल परत केला.मुलगा हा गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील असून तो चंद्रपूर येथे एका वसतिगृहात राहतो व तो कामानिमित्य बाजारात गेला होता,मात्र रस्त्यातच त्याचा मोबाईल हरविला व तो  मोबाईल चंद्रपूर वाहतूक शाखेतील सहाय्यक वाहतूक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र तुमसरे यांनी  आपल्या प्रामाणिकता दाखवीत किमती मोबाईल परत केला. यावरून पुन्हा एकदा वाहतूक पोलिसाच्या नदारीचा परिचय सर्वांपुढे आला.त्यामुळे नरेंद्र तुमसरे यांच्या प्रमानिकतेच्या परिचयामुळे   पुन्हा एकदा वाहतूक विभागाची मान  उंचावली आहे.




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.