সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, February 13, 2018

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा पूर्णाकृती पुतळा धूळखात

चंद्रपूर(ललित लांजेवार):
 चंद्रपूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तसेच राज्यसभेचे माजी उपसभापती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जयंत टॉकीज परिसरातील पूर्णाकृती पुतळा सध्या धूळखात असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच या पुतळ्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने सध्या या पुतळ्याच्या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपूत्र असलेले, शोषणाविरुध्द केलेला संघर्ष आणि समाजरचनेतील शेवटच्या माणसाच्या उत्थानासाठी असलेली तळमळ जनतेपुढे आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या महान विद्वान बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळाकडे कोणाचेच लक्ष नसल्याने त्या परिसरात दारूच्या बॉटलांचा खच, परिसरात पडलेला कचरा दिसून येत आहे. 

सध्या चंद्रपुरात स्वच्छ चंद्रपूराचे वारे वाहू लागले आहे. विविध चौकातील व महत्वाच्या ठिकाणचे नव्याने निधी उपलब्ध करून सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. यात शहरातील विविध ठिकाणचे सौंदर्यीकरण चंद्रपूर शहर महानगर पालिका यांच्या मार्फत करण्यात येत आहे. यात चंद्रपूर शहरातील गिरनार चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, रामाला तलाव परिसर, महाकाली मंदिर परिसर तसेच शहरातील अन्य परिसरात सुशोभीकरण व सौंदर्यीकरणाचे काम मोठ्या झपाट्याने सुरु आहे. मात्र चंद्रपूरच्याच नगरपालिकेचे उपाध्यक्ष राहिलेले व राज्यसभेचे माजी उपसभापती राहिलेल्या बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंत टॉकीज परिसरातील पूर्णाकृती पुतळ्याकडे पालिका प्रशासनाचे व स्मारक समितीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
महानगर पालिका अस्तित्वात आल्यानंतर काही समविचारी कार्यकर्त्यांनी महानगर पालिकेकडे या पुतळा व आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करण्याचे पत्र दिले होते. मात्र ४ वर्ष लोटूनही बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या या पुतळा परिसरात कचरा, तुटलेले बाक, दारूच्या बाटला असेच काहीसे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे अश्या या दुर्लक्षित पूर्णाकृती पुतळ्याकडे पालिका प्रशासन व स्मारक समिती लक्ष देणार का? असाच प्रश्न सामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.