সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, February 27, 2018

मराठी विद्यापीठ मंजूरीसाठी पाठपुरावा करणार

                                   - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 27 राज्यात स्थापन करण्यात येणाऱ्या पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाचा प्रस्ताव लवकरच केंद्र शासनाकडे पाठवून मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईलअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
            मराठी भाषा विद्यापीठासाठी वांद्रे येथील जागेच्या हस्तांतरणाची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रंथाली प्रकाशन तथा वाचक चळवळीचे संस्थापक दिनकर गांगण यांच्याकडे सुपूर्त केली.
            मुख्यमंत्री यावेळी म्हणालेमराठी अभिजात आहेच मात्र तिच्यावर राजमुद्रा उमटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ग्रंथालीने घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषा विद्यापीठासाठी जागा हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम पार पडत असल्याचा आनंद आहे.
            ते पुढे म्हणालेमराठी भाषा समृद्ध आहे. तथापिपुढील पिढीला मराठीचे महत्व समजावे यासाठी ग्रंथाली आणि अशा अन्य चळवळींचे योगदान महत्वाचे आहे. ज्ञानाच्या क्षेत्रातील कक्षा रुंदावणारी चळवळ असलेली ग्रंथाली चळवळ पुन्हा रुजण्यासाठी शासनाने मदतीची भूमिका घेतलीअसेही ते म्हणाले.
            विधान भवनातील समिती कक्षामध्ये झालेल्या या कार्यक्रमात यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडेआमदार आशिष शेलारआमदार प्रसाद लाडआमदार नरेंद्र पवारज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिकग्रंथालीचे कार्यकारी विश्वस्त सुरेश हिंगलासपूरकरसंपादक आणि विश्वस्त पद्मभूषण देशपांडेसंपादक अरुण जोशीधनश्री धारवलतिका भानुशाली,डिजिटल आवृत्तीचे संपादक धनंजय गांगणसाहित्यिक महेश केळुस्कर आदी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.