সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, February 28, 2018

शिवसेना भडकली;पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला

आदिवासी समाज व चंद्रपूरची जनता किशोर जोरगेवारांन सोबत - सुरेश पचारे
चंद्रपूर (ललित  लांजेवार):   
shivsena bhajap साठी इमेज परिणाम
                       राज्याच्या राजकारणात भाजप शिवसेना यांच्यातला वाद काही नवीन नाही,खांद्याला खांदा लाऊन सत्तेत बसेले दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप दररोज करतात,तुझ माझ जमेना, तुझ्या वाचुन करमेना अशी स्थिती  राज्यात या पक्षाची आहे.
                   मात्र चंद्रपूरच्या राजकारणात देखील आज परीयंत कधी न झालेला  शिवसेना भाजप वाद आता शहराच्या राजकारणात जोर पकडू लागल्याचे चिन्ह दिसु लागले आहे. सोमवारी चंद्र्पूर येथे शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जनतेची मूख्य समस्या असलेल्या जटपूरा गेटचा मुद्दा हाती घेत वाहतुकीची कोंडी होत असणाऱ्या जटपूरा गेट येथून वाहतुकीचा मार्ग मोकळा करा व नंतरच सौंदर्यीकरण करा यासाठी आंदोलन केले, तसेच जिल्हाधिकारी यांना माहितेचे निवेदन देत सूचनाही सुचविल्या,हे आंदोलन होत नाही तर लगेच चंद्रपूर महानगर पालिकेच्या भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांनी या आंदोलनावर आक्षेप घेत एक प्रेस नोट माध्यमांत प्रकाशित केली. जटपूरा गेटला धक्का जरी लागला तर आदिवासी समाज चूप बसणार नाही.  असा घानाघात करत शिवसेनेच्या आंदोलनाला विरोध दर्शविला.
                     याच भाजप व शिवसेनेच्या तू-तू मै-मै मध्ये आता चंद्रपूरचे शिवसेनेचे नगरसेवक व शहर प्रमुख सुरेश पचारे यांनी एक प्रेस नोट काढत भाजपला थेट प्रतिउत्तर देत धारेवर धरले आहे. पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला असा खोचक उत्तर शिवसेना नेते किशोर जोरगेवार याची बाजू राखत सुरेश पचारे यांनी भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांना दिले आहे. 
                   याच सोबत प्रसिद्धी पत्रकात शिवसेने भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांच्यावर बराचश्या प्रश्नांची भडीमार केली आहे.  शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जनतेची मूख्य समस्या असलेल्या जटपूरा गेटचा मुद्दा हाती घेतल्या नंतर भाजपाच्या नगर सेविका शितल कुळमेथे यांना आदिवासी समाजाच्या पुरातन वास्तुंचा साक्षात्कार झाला आहे. जेव्हा महानगर पालीकेने गिरनार चौकातील विर बाबूराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या नावाचा फलक काढून तो कच-यात टाकला तेव्हा त्या परदेशात होत्या का? असा टोला हाणत किशोर जारगेवार यांच्या लोकोपयोगी आंदोलनाला आदिवासी समाजाचा पाठींबा असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगर सेवक सुरेश पचारे यांनी स्पष्ट केले आहे. 
शिवसेनेचा विकासकामांना कधिच विरोध नव्हता ना तो असेल मात्र नको त्या गोष्टीवर खर्च करुन मुळ समस्या जैसे तेच ठेवली जात असेल तर त्याला मात्र शिवसेना तिव्र विरोध आहे असे देखील या पत्राच्या माध्यमातून म्हटल्या गेले आहे , सौंदर्यीकरनाला आमचा विरोध नाही मात्र पहिले येथील वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवा व नंतर हे सौंदर्यीकरण करा अशी भुमीका किशोर जोरगेवार यांनी घेतली आहे.
                         यात गोंड कालीन जटपूरा गेटचे अतिस्व मिटण्याचा प्रश्नच येत नाही. आणि शिवसेना असे पर्यंत तरी चंद्रपुरातील ऐतिहासिक वारसा असलेले गोंड कालीन वास्तूंना हात लावण्याची कोणाची हिम्मत नाही. आदिवासी समाज हा चंद्रपूर जिल्ह्याचे वैभव आहे या समाजाचा मोठा वारसा जिल्ह्याला लाभला आहे मात्र त्याच्या वीर पुत्रांचे एकही  स्मारक शहरात नाही. त्यामुळे जटपुरा गेट समोर विर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक व्हावे अशी सेनेची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र आता नगरसेविका शितल कुळमेथे यांनी प्रेसनोट प्रकाशित करुन यात जातीय राजकार घोडण्याचा प्रयत्न केला आहे. याला आदिवासी समाज कधीही स्विकारणार नाही. गोंड कालीन वास्तुंची दशा आजघडीला अतिशय बिगट झाली आहे. त्यासाठी कूळमेथे यांनी आजवर किती निवेदण दिलेत? पहिले  हे सांगावे ,त्याच्या स्वताच्या भानापेठ प्रभागात नागरिकांनी गोंड कालीन परकोटांवर अतिक्रम केले आहे. त्यांना ते दिसत नाही का ? ईक्रो प्रो संघटणेच्या वतीने परकोट स्वच्छता मोहीम  राबवली जात असतांना शितल कुळमेथे यांनी कितीदा उपस्थिती लावली पाहिले हे सांगावे केवळ राजीकय हेतुतून समाजाच्या नावाचा गैरवापर करून उघीच  बडबड करु नये, आदिवासी समाज हा जागरुत आहे. आणि भाजपाने या समाजासाठी काय केले हेही या समाजाला चांगल्याने कळते त्यामूळे अश्या नगर सेवीकांच्या मागे हा समाज कधिच उभा राहणार नाही.  हे आदिवासी समाजाचे नेते तसेच आदी जनचेतना जागर या संस्थेचे अध्यक्ष अशोक तुमराम यांनी किशोर जोरगेवार यांच्या धरणे आंदोलनात उपस्थित राहून दाखऊन दिले आहे. त्यामुळे कुळमेथे यांनी पहिले त्यांच्या प्रभागातील परकोटांवर नारिकांनी केलेले अतिक्रमण काढावे त्यात भाजप त्यांना मदत करत नसेल तर तसेही सांगावे आम्ही गोंड कालीन वसा वाचवीण्यासाठी प्रयत्नशील असुन हे अतिक्रमण काढण्यात आम्ही तुम्हाला मदत करु असा सल्लाही पचारे यांनी शितल कुळमेथे यांना दिला आहे. 
                        याअगोदर पाच ठिकाणी गोंड कालीन परकोट तोडल्या गेले ते कुणाला विचारून तोडण्यात आले व त्यावेळेस कोणते अधिकारी होते? तसेच २.५० कोटी रुपये जटपुरा गेटच्या सौदर्याकरीता सरकारकडून दिले आहे जटपुरा गेट येथे वाहतूक कोंडी हि खूप मोठी समस्या आहे आणि इथल्या लोकप्रतीनिधीकडून तिथे सौंदर्यीकरणासाठी २.५० कोटी रुपये खर्च करीत आहेत ते पैसे तिथे खर्च करण्याची काही गरज नाहि तेच २.५० कोटी रुपये परकोटाच्या डागडुजी करीता खर्च करावे. या जटपुरा गेटच्या सौंदर्याकरीता शहरातील मोठे व्यापारी तसेच अनेक कंपन्या करायला तयार आहे पण त्यांना हे शासन करू देत नाही.  आणि तेच काम फुकट होत असताना त्याठिकाणी २.५० कोटी रुपये खर्च करण्याची काही गरज नाही आहे या संपूर्ण विषयाकडे नगरसेविका शितल कुळमेथे यांनी लक्ष द्यावे आणि विनाकारण दोषारोपण करू नये.  असा सवाल देखील पचारे यांनी करत भापला चांगलच सवालाच्या घेऱ्यात उभे केले.  त्यामुळे दररोज होणाऱ्या भाजप शिवसेना वादात नक्कीच चंद्रपूरच्या नागरिकांच्या समस्या मार्गी लागणार का ? कि हे दोन्ही पक्ष दररोज आप-आपल्या कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून एकमेकांवर टीका करतच राहणार हे मात्र योग्य ती वेळच ठरवेल.त्यामुळे शिवसेनेच्या या खोचक सावलांचे उत्तर भाजप कोणत्या पद्धतीने देते ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे. 
shivsena bhajap साठी इमेज परिणाम

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.