সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, January 09, 2018

अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चिमूर येथे मंजूर

आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नाला यश 
चिमूर प्रतिनिधी:  
वरोरा व ब्रह्मपुरी पोलीस उपविभागाचे विभाजन करत नवीन चिमूर पोलीस उपविभागीय कार्यालय आता चिमूर येथे होणार असल्याचे राज्याच्या गृह विभागाने मंगळवारी स्पष्ट केले आहे. पूर्वी चिमूर तालुकयातील जनतेला उपविभागीय पोलीस कार्यालय वरोरा येथे जावे लागत होते नंतर ब्रम्हपुरी ला जोडण्यात आले नागरिकांना  उप- विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय ब्रम्हपुरी साठी अडचणी चे जात होते हि दखल आमदार किर्तीकुमार भांगडीया घेत व तसा पाठपुरावा करीत १६ आगस्ट २०१७ च्या शहीद दिन कार्यक्रमात उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कडे चिमूर क्राती शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची मागणी केली होती तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरीचे आश्वासन दिले अवघ्या पाच महिन्यात मुख्यमंत्र्यांचे आश्वासन खरे ठरले असून आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नाचे फलित ठरले आहे राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली. 

त्यामध्ये  नमूद केले होते की, सन 2011 चे जनगणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या 22,04,307 इतकी असून चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा  असल्याने सदर परिसरामध्ये नक्षलवादी कारवायांवर  लक्ष केंद्रीत करणे गरजेचे झाले आहे. तसेच चंद्रपूर ते चिमुर येथील अंतर 90 कि.मी. पेक्षा जास्त असल्याने  त्या विकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर  वेळीच नियंत्रण  करण्यास चिमूर येथेअप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाची अंत्यत आवश्यकता आहे.  

शासनपत्रान्वये चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे अपर पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय निर्माण  करण्याऐवजी
पोलीस उपअधीक्षकाचे कार्यालय  निर्माण  करणेबाबतचा प्रस्ताव सादर करण्याबाबत पोलीस महासंचालक,
महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना सूचित करण्यात आले होते. त्यानुसार पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई
यांनी  दिनांक 05.06.2017 च्या पत्रान्वये  चिमूर येथे पोलीस उपअधीक्षक कार्यालय निर्माण  करणेबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. व  दिनांक 27.10.2017 च्या पत्रान्वये  दिनांक 04.03.2014 च्या शासन निर्णयानुसार पोलीस प्रशिक्षण  केंद्र, पांढरकवडा, जि .यवतमाळ करीता मंजूर करण्यात आल्याने  पोलीस उपअधीक्षकांच्या 20 पदांपैकी 01 पद प्रस्ताववत चिमूर  पोलीस उपविभागाकरीता स्थानांतरीत करण्याचे सांगण्यात आले आहे.  

या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात तीन पोलीस ठाणे समाविष्ठ करण्यात आले असून त्यात चिमूर , भिसी व शेगाव पोलीस ठाण्यांचा समावेश आहे चिमूर येथे एसडीपीओ कार्यालय झाल्याने कमी अंतर व कमी आर्थिक बचत मध्ये कामे जनतेची होणार आहे . 

चिमूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय राज्य शासनाने मंजूर केल्याबद्दल व आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नाला यश आल्याबद्दल भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष डॉ श्याम ह्टवादे ,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल कोलते ,जिल्हा सचिव संदीप पिसे ,भाजप तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर, तालुका महामंत्री विनोद अढल, प्रवीण गणोरकर, विलास मेहरकुरे, भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले महामंत्री योगेश नाकाडे,असिफ शेख ,महिला मोर्चा तालुका अध्यक्ष गिता लिगायत, महामंत्री ज्योती ठाकरे, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष एकनाथ थुटे, प. स सदस्य पुंडलिक मते, अजहर शेख, प्रदीप कामडी ,नर्मदा रामटेके ,जी प सदस्य मनोज मामीडवर ,रेखा कारेकर उपसरपंच विजय झाडे तसेच चिमूर नगर परिषद नगराध्यक्ष शिल्पा राचलवार ,उपाध्यक्ष तुषार शिंदे ,स्थायी समिती सभापती छाया कनचलवार ,बांधकाम सभापती नितीन कटारे, नगरसेवक सतीश जाधव, नगरसेवक जयश्री निवटे, नगरसेवक भारती गोडे, नगरसेवक हेमलता ननावरे,नगरसेवक तुषार काळे जनसंपर्क कार्यलय प्रमुख विक्की कोरेकर आदी शेकडो कार्यकर्त्यांनी स्वागत करीत उत्साह साजरा केला

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.