সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 05, 2018

लबाडपणा करून लाटले मुख्यप्रशासकाचे पद: दणका युवा संघटनेचा आरोप

तात्काळ पदावरून हटवावे;
पोलीसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी
रामटेक तालुका प्रतिनिधी:
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समीतीचे अशासकीय प्रशासक मंडळाचे मुख्य प्रशासक अनिल कोल्हे हे पदावर राहण्यास अपात्र आहेत. रामटेकच्या स्थानीक आदर्श  विद्यालयांत शिक्षक असल्याने ते नोकरदार वर्गात मोडतात.त्यामुळे त्यांची नियुक्ती ही नियमबाहय असल्याची तक्रार दणका युवा संघटन,रामटेक चे अध्यक्ष अजय किरपान यांनी केली आहे.
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समीतीचे अशासकीय प्रशासक मंडळाची नुकतीच राज्य सरकारने घोषणा केली.तसे अधिकृत आदेश नागपुर जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले यांनी जारी केले व त्यानुसार मुख्यप्रशासक अनिल कोल्हे,उपमुख्यप्रशासक किशोर रहांगडाले व अन्य प्रशासकांनी दिनांक 22 डिसेंबर 2017 रोजी कार्यभार स्विकारला.मात्र अलिकडेच आकोट कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या अतुल माधवराव म्हैसने या संचालकांना अकोल्याचे जिल्हा निबंधक यांनी ते नोकरी करीत असल्याने अपात्र घोशित केल्याने व अशाच कारणांसाठी आकोटच्या बाजार समीतीच्या सभापतीसह सात संचालकांनाही अपात्र घोषीत केल्याने रामटेकच्या बाजार समीतीचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले मुख्यप्रशासक अनिल कोल्हे हे पदावर कसे काय राहू शकतात असा प्रश्न  अजय किरपान यांनी उपस्थित केला आहे.कोल्हे यांना तात्काळ पदावरून दूर करावे व खोटे शपथपत्र सादर केल्याबाबत पोलीसांत तक्रार दाखल करावी अशी  मागणी या निवेदनातून करण्यांत आली आहे.

सविस्तर वृत्त असे की रामटेक व मौदा अशी  दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेली रामटेक-मौदा कृषी उत्पन्न बाजार समीतीचे अलिकडेच राज्या सरकारने विभाजन केले व या दोन्ही बाजार समीत्यांवर स्वतंत्र अशासकीय प्रशासकीय मंडळे नियुक्त केली आहेत.रामटेकच्या या विभाजीत बाजार समीतीवर मुख्य प्रशासक या पदावर रामटेकच्या स्थानीक आदर्श  विद्यालयांत शिक्षक या पदावर कार्यरत असलेले अनिल कोल्हे यांची व अन्य 16 असे एकूण सतरा सदस्यांची नेमणूक केली आहे.‘‘महाराष्ट्र कृषी  उत्पन्न पणण (विकास व विनियम) नियम 1967 चे नियम जी च्या तरतूदीनुसार शासकीय सेवक किंव्हा स्थानीक स्वराज्य संस्थेचा कर्मचारी हा असेल व त्याचे मुख्य उत्पन्नाचे साधन शेती नसेल तर अशी  व्यक्ती संचालक पदासाठी अपात्र ठरते’’   त्यामुळे  आकोटच्या म्हैसने यांना जो न्याय लावला तोच अनिल कोल्हे यांना लावावा . व त्यांना पदावरून तात्काळ दूर करावे अशी  मागणी त्यांनी नागपुर जिल्हा उपनिबंधक यांना प्रेशीत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

रामटेक बाजार समीतीवर अशासकीय प्रशासक मंडळ राज्य सरकारच्या सुचनेनुसार व  त्यांनी दिलेली नावे जिल्हा उपनिबंधकांनी राज्य सरकारच्या वतीने जाहीर केली आहेत.यासाठी संबधित सर्वांचे षपथपत्र घेण्यांत आली आहेत.या शपथपत्रामध्ये हे सर्व शेतकरी असल्याचे त्यांनी शपथेवर जाहीर केले आहे व त्यांचेशी संबधित सातबाराचा उतारा जोडल्याने ते शेतकरी असल्याचे दिसून येते.हे सर्व शेतकरी आहेत त्यामुळे त्यांची नियुक्ती करण्याचे आदेश   जिल्हा उपनिबंधकांनी काढले आहेत.अनिल कोल्हे यांनी आपल्याश पथपत्रांत ते कुठेही शासकीय नोकरीत नाहीत असा उल्लेख केला आहे. खोटे बोलून तेही शपथपत्रावर कोल्हेंनी हा लबाडपणा जाणीवपूर्वक केला आहे त्यांचा हा लबाडपणा कुठल्याही परीस्थितीत खपवून घेतला जाणार नाही,प्रसंगी आंदोलन करण्याचीही तयारी दणका संघटन करेल असा ईशाराही अजय किरपान यांनी दिला आहे.

तक्रार आल्यास चौकशी  व कारवाई करू असे उपनिबंधक सतिश भोसले यांनी यापुर्वीच स्पष्ट  केले. 
आहे.उपरोक्त पार्ष्वभूमीवर मुख्यप्रशासक असलेल्या अनिल कोल्हे यांची गच्छंती अटळ मानली जात असून
अकोला जिल्हा उपनिबंधक यांचे अलिकडील आकोट येथील संचालक अपात्र करण्याचे आदेशाचे व दणका
यवा संघटनच्या तक्रारीच्या पार्ष्वभूमीवर रामटेकच्या बाजार समीतीचे मुख्य प्रशासक अनिल कोल्हे यांचेवर
काय कारवाई होते याकडे संपुर्ण जिल्हयाचे लक्ष वेधले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.