भिमा कोरेगाव मध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्ह्यात
मुल, सावली , ब्रम्हपुरी ,चिमूर तसेच अनेक ठिकाणी सर्व व्यापारी
प्रतिष्ठाने, टपऱ्या ,पानठेले बंद ठेवून झालेल्या घटनेचा निषेध बंद पाळण्यात
येत आहे. अत्यावश्यक सर्व सेवा सुरळीत सुरू आहेत.
भिमा कोरेगांव
येथील विजयी स्तंभाला आणि वढू बुद्रुक येथील गोविंद गायकवाड यांच्या
स्मारकास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलितांवरील समाजकंटकांकडून करण्यात
येत असलेली दगडफेक झाल्याने भिमा कोरेगाव गेलेले अनेक कार्यकर्ते जखमी झाले
असून जवळपास ४० हून अधिक वाहनांची नासधूस झाली आहे. मागील अनेक वर्षापासून
दरवर्षी १ जानेवारीला भिमा कोरेगांव येथील विजयी स्तंभास आणि छत्रपती
संभाजी महाराजांचा अंत्यविधी केलेल्या गोविंद गायकवाड यांच्या स्मारकाला
अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दलित समाज जातो. मात्र या कालावधीत
दलित समाजातील बांधवांवर कधीच हल्ला कोणी केला नाही की त्यांना त्रास
देण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र डिसेंबर २०१७ मध्ये एका परदेशी प्रसार
माध्यमातील वेबसाईटने भिमा कोरेगांवच्या इतिहासाची मोडतोड करून चुकीच्या
पध्दतीने बातमी प्रसिध्द केली. ही बातमी मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर
व्हायरल झाल्याने पहिल्यांदाच समाजकंटकांकडून दलितांवर दगडफेक करत पळवून
लावण्याचा प्रयत्न केला.
काल रात्री पासूनच हजारो लोक आणि
तितकीच वाहने क्रांतीस्तंभापासून जवळच असलेल्या पुलालगत पार्क केलेली होती.
तर आज सकाळ पासुनच लाखो लोक या ठिकाणी जमा झाले होते. तर काही लोक भगवे
झेंडे बाईकवर लावून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. तर काही
लोक दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत होते. तर अचानक दुपारी एकच्या दरम्यान
भिमा कोरेगाव जवळच्या पार्किंग भागात दगडफेकीला सुरूवात झाली. इमारतीच्या
गच्चीवरून समाजकंटक दगडफेक करून पळून जात होते त्यांना काही महिलाही अटकाव
करण्यात पुढे आल्या की ते लोक लपुन पळून जात हीच स्थिती वढू गावातही होती.
दुपारी सुमारे तीनच्या दरम्यान शिक्रापुर पोलिस ठाण्यात तोडफोड करण्यात
आलेल्या वाहनासह तक्रारकर्ते दाखल होवू लागले पोलिस ठाण्यात एक दोन
कर्मचारी सोडता मनुष्यबळ कमी होते. वाहनावरील निळे व पंचशील झेंडे पाहून
दगडफेक करण्यात येत होती. पाठीमागून दगड मारता हिंम्मत असेल समोर या अशा
प्रतिक्रीया तक्रार महिलांनी करीत पोलिस ठाण्याला घेरावच घातला. एकेक
तक्रारदार येता येता पोलिस ठाण्यात गर्दी वाढू लागताच पोलिस मनुष्यबळही
वाढले. तीन वाजल्यापासून परिसरात भगवे झेंडेधारी यांनी दुकाने हॉटेल्स ढाबे
बंद करण्याचे आवाहन करताच धडाधड शटरडाऊन झाले. त्यामुळे सकाळपासून आलेल्या
लोकांचे अन्न पाण्यावाचून हाल झाले. परिस्थिती अद्यापही तणावाखाली असून
लोक दहशती खाली आहेत. दगडफेक करीत असलेल्यांना पकडायचे सोडून पोलिस लोकांना
पांगविण्यासाठी लाठीचा वापर करीत होते.