সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, January 09, 2018

सरपंच योगीता गायकवाड यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी बिडीओंच्या नेतृत्वात त्रिसदस्यिय चौकशी समीती.

चौकशी  समीतीने सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश 
रामटेक तालुका प्रतिनिधी:  
पंचायत समीती रामटेक अंतर्गत ग्रामपंचायत शितलवाडी(परसोडा)येथील सरपंच कुमारी योगीता गायकवाड यांनी खाजगी भुखंड  मालकास लाभ पोहचविण्याच्या हेतूने  जिल्हा परिषदेच्या  मालकीच्या जागेतून रस्ता बांधकाम  ग्रामपंचायत निधितून करून दिल्याच्या गैरप्रकाराची चौकशी  करण्याचे आदेश जिल्हा परिषद नागपुर प्रशासनाने दिले आहेत.यासोबतच ही चौकशी  सात दिवसांचे आत करून चौकशी अहवाल सादर करण्याचेही आदेश  दिले आहेत याप्रकरणी अधिक वृत्त असे की, ग्रामपंचायत शितलवाडी(परसोडा) येथील सरपंच  कुमारी योगीता गायकवाड यांनी खाजगी भुखंड  मालकास लाभ पोहचविण्याच्या हेतूने जिल्हा  परिषदेच्या मालकीच्या जागेतून रस्ता बांधकाम ग्रामपंचायत निधितून करून दिल्याच्या गैरप्रकाराची चौकशी करावी अशा आशयाची तक्रार  याच ग्रामपंचायतचे सदस्य विनोद सावरकर यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी यांना केली होती.

या तक्रारीच्या अनुशंगाने नुकत्याच संपन्न झालेल्या स्टॅंडींग कमेटीच्या सभेत हा विषय  चर्चेला आला व त्यावर 
अनेक  पदाधिकारी यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.त्यामुळे रामटेकचे गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय चौकशी  समीती गठीत करण्यांत आली.रामटेक जि.प.बांधकाम उपविभागाचे उपअभियंता व पंचायत समीती रामटेकचे विस्तार अधिकारी (पंचायत) यांची समीतीचे सदस्यपदी नियुक्ती करण्यात
आली आहे उपमुख्यकार्यकारी अधिकारी,जि.प.नागपुर यांचे दिनांक 3 जानेवारी 2018 चे पत्रानुसार  उपरोक्त समीतीने शितलवाडी येथील कथीत गेरप्रकार व आर्थिक तथा प्रषासकीय अनियमीततेची सखोल  चौकशी 
करावी व चौकशी  अहवाल संबधित कागदपत्रांसह सात दिवसांत सादर करावा असे  आदेशीत  .

या केले आहे , ग्रामपंचायतने केलेली करवाढही नियमबाहय असून ग्रामपंचायतच्या सदस्यांना विष्वासात न घेता सरपंचांनी ती लागू केल्याचा आरोपही सदस्य सावरकर यांनी बातमीदारांषी बोलतांना  व्यक्त केला आहे .





শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.