সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, January 21, 2019

विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास हेच खरे शिक्षण :सहदेव आव्हाड

कारेगाव येथील प्राथमिक शाळेत शिक्षण परिषदेचे आयोजन
 शिक्षकांना मिळाली विविध अध्यापन तंत्राची माहिती
 अण्णापूर - पुणे प्रतिनिधी
  शिक्षण परिषदेच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेचे विस्ताराधिकारी सहदेव
आव्हाड यांचा सन्मान करताना पदवीधर शिक्षक गंगाराम थोरात,
 ब्रिटिश कौन्सिलचे राज्यमार्गदर्शक ज्ञानेश पवार , साधन व्यक्ती बेबी तोडमल ,
 शिवाजी पावशे व उपस्थित शिक्षक
 ज्ञानरचनावादी अभ्यासक्रमानुसार विद्यार्थी हा स्वतःच्या ज्ञानाचा शोध स्वतः घेवुन ज्ञानाचे संशोधन व निर्मिती करतो. त्यासाठी त्याच्यातील अभिव्यक्ती कौशल्याचा ख-या अर्थाने विकास करणे हेच खरे शिक्षण असुन त्यासाठी शिक्षकांनी विविध अध्यापन तंत्राचा उपयोग उपयोग करायला हवा असे मत पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे विस्ताराधिकारी सहदेव आव्हाड यांनी व्यक्त केले.जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्था , लोणी काळभोर व पुणे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी संपूर्ण जिल्ह्यात शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येते. कारेगाव (ता.शिरुर )केंद्राची सहावी शिक्षण परिषद कारेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर व केंद्रप्रमुख श्रीहरी पावशे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी शिक्षकांना संबोधित करताना आव्हाड यांनी हे विचार व्यक्त केले.
याच शिक्षक परिषदेत कारेगाव शाळेचे पदवीधर शिक्षक शिवाजी पावशे यांनी अभिव्यक्ती कौशल्ये व त्याच्या विकासासाठी वापरावयाच्या विविध तंत्राची माहिती दिली तर. पाठ शिकवताना क्यु आर कोड स्कॕनरचा अध्यापनातील वापर या विषयावर ठकाराम पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कारेगाव केंद्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पहिली ते आठवीला शिकवणारे सत्तर शिक्षक उपस्थित होते.
या परिषदेचे संयोजन पंचायत समितीच्या साधनव्यक्ती बेबी तोडमल यांनी केले. तर परिषदेचे प्रास्तविक कारेगाव शाळेच्या मुख्याध्यापिका मिरा खैरे, सुत्रसंचालन ब्रिटिश कौन्सिलचे राज्यमार्गदर्शक ज्ञानेश पवार तर आभार पदवीधर शिक्षक गंगाराम थोरात मानले. सदर परिषद यशस्वी होण्यासाठी कारेगाव शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. एकंदरीत या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने कारेगाव केंद्रातील शिक्षकांना विविध अध्यापन तंत्रासह गटकार्याच्या माध्यमातून स्वतःला अभिव्यक्त होता आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याच्या विकासासाठी विविध मार्गांचा नव्याने शोध घेता आला हे विशेष.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.