वाडी नगर परिषदचा नृत्यदर्पनम
नागपूर / अरूण कराळे:
पृथ्वीच्या उत्पत्तीपासून स्वतःचे अस्तित्व राखण्याच्या स्पर्धेत अवघी सजीव सृष्टी धडपडताना दिसते. जे या स्पर्धेत यशस्वी झाले ते टिकले आणि मागे पडले ते नामशेष झाले. एकाच जागी उभी राहून वाढणारी झाडे सुद्धा अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी एकमेकांपेक्षा उंच वाढण्याची स्पर्धा करतात मग अशा सर्वव्यापी स्पर्धेपासून मानवी जीवन मुक्त कसे असेल नृत्य स्पर्धेत झटणारे विद्यार्थी, आणि क्रीडागंणावर झुंजणारे विद्यार्थी यांची स्पर्धा एकच आहे कारण स्पर्धा हा निसर्गचक्राचाच अविभाज्य घटक आहे. असे प्रतिपादन खासदार कृपाल यांनी केले .
वाडी नगर परिषद तर्फे गणराज्य दिनानिमीत्य वाडी विभाग स्तरावरील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा नृत्यदर्पनम सांस्कृतीक नृत्य स्पर्धा शनिवार २६ जानेवारी रोजी दत्तवाडीतील गजानन सोसायटी क्रिडा मैदानावर पार पडली त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते . उदघाटन फॉरेन्सीक लॅब गृहविभागाचे उपसंचालक विजय ठाकरे यांनी केले .व्यासपीठावर नगराध्यक्ष प्रेम झाडे , उपाध्यक्ष राजेश थोराने , क्रिडा व सांस्कृतीक सभापती मीरा परिहार , पाणी पुरवठा सभापती निता कुनावार ,महीला व बालकल्याण सभापती कल्पना सगदेव , आरोग्य सभापती शालीनी रागीट , अस्मीता मेश्राम , डॉ .सारीका दोरखंडे , केशव बांदरे , कैलाश मंथापूरवार ,सरीता यादव , मंजुळा चौधरी , दिनेश कोचे , शऋघ्नसिंह परिहार , पराग भावसार , स्वामीप्रसाद सुद , सुशील शर्मा उपसरपंच गजानन रामेकर प्रामुख्याने उपस्थित होते . सर्वप्रथम तेजश्री प्रेम झाडे व मेधावी पांडे यांनी शिववंदनाद्वारे नृत्य स्पर्धेला प्रारंभ केला . मागील वर्षीचे विजेते जिंदल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यानी स्वागत गीत सादर केले .वाडी परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये नृत्यस्पर्धेची आवड निर्माण व्हावी व त्यांनी आपल्या कलेचे प्रदर्शन करावे या दृष्टिकोनातून वाडी नगर परिषद तर्फे नृत्यदर्पणम हा कार्यक्रम सुरू केल्याचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी सांगीतले .नृत्यदर्पणम मध्ये वर्ग ४ ते ७ वी गटात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दवलामेटी , द्वितीय क्रमांक बुध्दीस्ट इंटरनॅशनल स्कूल वाडी , तृतीय क्रमांक धरमपेठ इंग्लीश माध्यम स्कूल डिफेन्स , वर्ग ८ ते १० वी गटात प्रथम क्रमांक केंद्रीय विद्यालय डिफेन्स , द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद हायस्कूल डिफेन्स , तृतीय क्रमांक जिंदल पब्लीक स्कूल वाडी , वर्ग ११ते १२ वी गटात प्रथम क्रमांक जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाडी , द्वितीय क्रमांक केंद्रीय विद्यालय व महाविद्यालय डिफेन्स यांनी पटकाविला पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्याचे मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह , प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .नृत्य स्पर्धेचे संचालन गोवींद त्रीवेदी ,परिक्षक म्हणून उत्सा बॅनर्जी , मधुमीता चक्रवर्ती , जवाहर सुर्यवंशी यांनी जबाबदारी पार पाडली .प्रास्ताविक मुख्याधिकारी राजेश भगत , संचालन व आभार प्रदर्शन उपमुख्याधिकारी आकाश सहारे यांनी केले . ट्रान्सपोर्ट आघाडीचे सुनील पांडे, मानसींग ठाकूर , किताबसिंग चौधरी , महेंद्र शर्मा , राकेश चौधरी , ओमप्रकाश मिश्रा, अखिलेशसिंह यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .आयोजनासाठी अभय कुनावार ,योगेश देशपांडे , योगेश जहागीरदार , संदीप अढावू , भारत ढोके , अश्वलेखा भगत , मनोहर वानखडे ,कपील डाफे ,धनंजय गोतमारे , रमेश इखनकर , रमेश कोकाटे ,लक्ष्मण ढोरे , कमलेश तिजारे, अवी चौधरी , अशोक जाधव आदींनी सहकार्य केले .