সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, January 23, 2019

दोसा विकून गडकरींवर लिहला काव्यसंग्रह



'भारताचा कोहिनुर गडी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन

ममता खांडेकर/ नागपूर 

विवेक शंकर बेहरे या तरुण युवा कवीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या व्यक्तिमत्वाने तसेच कार्य कर्तृत्वाने प्रेरित होऊन ५५ पानांचे ' भारताचा कोहिनुर गडी' या काव्य संग्रहाचे प्रकाशन केले. गडकरी यांच्या हस्तेच काव्य संग्रह प्रकाशित झाले असून गडकरी यांनी या युवा कवीचे विशेष कौतुक केले. दोसा विकून विवेक यांनी हा कविता संग्रह प्रकाशीत केला.

जानकी टॉकीज जवळ विवेकचा 'साई कृपा' नाश्ता पॉईंट आहे. दोसा, उत्तपम आणि सांबर-वडे विकून दररोजच्या कमाईतून खर्चवजा उरलेली रक्कम तो काव्य संग्रहाच्या प्रकाशनाकरिता प्रकाशकाकडे जमा करीत होता. स्व.वामनराव बरडे लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक नरेश बरडे व माजी नगरसेविका साधना बरडे यांनी मदतीचा हात देऊन विवेकचे स्वप्न पूर्ण केले.गडकरी यांच्यावर नागपूर शहरातीलच नव्हे तर देशातील अनेक नागरिक मनापासून प्रेम करतात. असाच एक तरुण चाहता म्हणजे विवेक बेहरे यांनी गडकरी जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हापासून त्यांच्यावर कविता लिहायला सुरुवात केली. गडकरी यांच्या काळात निर्माण झालेल्या सिमेंट रस्त्यांना इतक्या वर्षा नंतरही एकही भेग पडली नाही याच त्यांच्या पोलादी व्यक्तिमत्वाने विवेक प्रभावित झाला. एकूण ५१ कविता त्याने रचल्या असून काव्य संग्रहातील कवितेसोबतचे 'गद्य' तसेच गडकरी यांचे विविध छायाचित्रेही विशेष लक्ष वेधतात. प्रकाशन सोहळ्यात नरेश बरडे, ओबीसी मोर्चाचे महामंत्री संजय घाटे,सचिन पिपले, दिलीप गुहे,धीरज सिक्कलवार आदी उपस्थित होते.

.......

गडकरींनी शब्द पाळला-
गेल्या दिवाळीत मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्याकडे गडकरी हे फराळासाठी आले असता जाधव यांनी गडकरी यांच्यासोबत विवेकची भेट करून दिली. विवेकनी आपल्या कविता गडकरींना ऐकवल्या.'या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यावर मला कविता संग्रह भेट दे' असे गडकरी यांनी सांगितले होते. नुकतेच आपल्या व्यस्तम कार्यक्रमातुन वेळ काढून गडकरी यांनी स्वहस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करून ही प्रेमरूपी भेट स्वीकारली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.