खबरबात/धुळे, गणेश जैन
बळसाणे : माळमाथा भागातील बळसाणे येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत नुकतेच गरजू व दारिद्रयरेषेखालील ३१ महिलांना मोफत गँस कनेक्शन वाटप करण्यात आले याप्रसंगी शुभंकर गँस एजन्सी चे व्यवस्थापक संदीप वाघ तसेच बळसाण्याचे भाजपातर्फे गँस संच वाटपाचा कार्यक्रम पदधीकाऱ्यांनी हाती घेतला होता
बळसाणे येथील लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासे , उपसरपंच सुदाम खांडेकर व पो.पा. आनंदा हालोरे तसेच ग्रा.पं.सदस्य देवीदास लोणारी , नाना सिसोदे , विकास दाभाडे यांच्या हस्ते गँस कनेक्शन संच वाटप करण्यात आले व्रुक्षतोड केल्याने परिसरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे याकाणाने मानवी आरोग्य धोक्यात येत आहे या परिसरात स्वंयपाकासाठी झाडे तोडली जात असल्याने ते लाकडी स्वयंपाक घरात उपयोग पडत असल्याने त्यांच्या वापर केला जाते यामुळे वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणावर तयार होते तसेच महिलांचाही आरोग्यावर विपरीत परिणाम होतो लाकूड तोड कमी करण्यासाठी व महिलांना आरोग्य संपन्न जिवन जगता यावे याकरिता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेतून साक्री तालुक्यातील बळसाणे येथील दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना गँस कनेक्शन वाटप करण्यात आले याकामी सरपंच दरबारसिंग गिरासे , उपसरपंच सुदाम खांडेकर , पो.पा. आनंदा हालोरे व गरजू कुटुंब उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी एच.पी. गँस एजन्सी चे व्यवस्थापक संदीप वाघ यांचे सहकार्य लाभले