भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवारया दोन नावांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
२७, २८ ऑक्टोबरला भाजपाची विधिमंडळ पक्षनेता निवडीची बैठक होण्याची शक्यता आहे. पक्षाचे महाराष्ट्रातील केंद्रीय निरिक्षक असणारे ओम माथूर यांनी सप्ष्ट केले की सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे पुरेसे संख्याबळ आहे आणि ती प्रक्रिया दिवाळी नंतरच सुरु केली जाईल. विधिमंडळ पक्षनेता निवडीच्या प्रक्रियेच्या दिवशीच मुख्यमंत्र्याच्या शपथविधीची शक्यता असून, ५ ते ७ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाची स्थापना केली जाण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.