चंद्रपूर दि.02- निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक राजर्षी कुमार यांनी आज विधानसभा निवडणूकीच्या मिडीया सेंटरला भेट देवून कामकाजाची पहाणी केली. जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, निवडणूक खर्च नोडल अधिकारी संतोष कंदेवार, निरीक्षकाचे संपर्क अधिकारी अभय जोशी, नितीन यादव, कृष्णकांत खानझोडे, प्रकाश उमक, संदिप वाघ व राहुल मन्नाडे यावेळी उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक राजर्षी कुमार यांनी मिडीया सेंटरच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. उमेदवाराचा जाहिरात खर्च नियमित सादर करण्याच्या सूचना त्यांनी मिडीया सेंटरला दिल्या. त्याचप्रमाणे पेडन्युज व सोशल मिडीयाबाबत महत्वाच्या सूचना केल्या. प्रत्येक उमेदवाराला सोशल मिडीयावरील जाहिरातीसाठी परवानगी घेणे आवश्यक असून त्याचा खर्च त्यांनी निवडणूक खर्च लेख्यात नमूद करणे आवश्यक असल्याचे कुमार यांनी सांगितले.
मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त वाढावी यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाला मिडीया सेंटरच्या वतीने मोठया प्रमाणात प्रसिध्दी देण्यात यावी अशा सूचना त्यांनी केल्या. इलेक्ट्रॉनिक मिडीया व लोकल केबलवरील जाहिराती सनियंत्रण नियमित करण्यात यावे असे कुमार यांनी यावेळी सूचविले. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विधानसभा जनादेश 2014 ही पुस्तिका माध्यम प्रतिनिधी व निवडणूकीच्या अभ्यासकांना उपयुक्त अशीच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.