সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, August 05, 2018

‘फ्रेंडशिप डे, तीन मित्र बुडाले













नागपूर -  फ्रेंडशिप डे साजरा करण्यास भांडे प्लॉट नागपूर येथून गेलेल्या आठ तरुणांपैकी तिघांचा तेलगावजवळ असलेल्या सालईमेंढा तलावात तीन तरुण बुडाल्याची घटना रविवारी (५ आॅगस्ट) दुपारी ४ च्या सुमारास घडली.

नागपूर शहरातील काही विद्यार्थी रविवारी सायंकाळी पिकनिकच्या निमित्ताने हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारात असलेल्या तलावाजवळ आले होते. त्यातील तिघांना पोहण्याचा मोह न आवरल्याने ते तलावात उतरले आणि खोल पाण्यात गेल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला. त्यातील एकाचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले असून, दोघांची शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. प्रथमेश ऊर्फ गुड्डू सिद्धांत सिडाम (१७, रा. भांडेप्लाट, उमरेड रोड, नागपूर), सागर सुरेश जांबुळकर (१७, रा. भांडेप्लाट, सेवादलनगर, नागपूर व बंटी प्रेमलाल निर्मल (१४, रा. भांडेप्लाट, उमरेड रोड नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. या तिघांसह त्यांचे अन्य पाच मित्र फ्रेंडशीप डे निमित्त हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारात तलावाजवळ फिरायला आले होते. दरम्यान, या तिघांना पोहण्याचा मोह झाला आणि ते तलावात उतरले. उर्वरित पाच जण काठावर उभे होते. पाहता पाहता तिघेही खोल पाण्यात गेले आणि गटांगळ्या खाऊ लागले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.