कमल स्पोर्टीग क्लब, चंद्रपूर या सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राशी बांधीलकी जोपसणाÚया संस्थेचे संस्थापक स्व. कालीदास गं. अहीर यांच्या जन्मदिवसा निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 12 आॅगष्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात 251 रक्तदात्यांनी रक्तदान करून या राष्ट्रीय व सामाजिक कार्यात अमुल्य योगदान दिले.
स्थानिक गंज वार्ड येथील आय.एम.ए. सभागृहात आयोजित या रक्तदान शिबीराचे उद्घाटन केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांचे शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमास आ. नानाभाऊ शामकुळे, राजुराचे आ. अॅड. संजय धोटे, राज्य वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा स्था.स. अध्यक्ष राहुल पावडे, शास. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एस. मोरे, आय.एम.ए.चे अध्यक्ष डाॅ. प्रमोद राऊत, भाजपा नेते विजय राऊत, खुशाल बांेडे, राहुल सराफ, डाॅ. एम. जे. खान, डाॅ. राजु सैनानी, डाॅ. अशोक भुकते, डाॅ. मुनघाटे, डाॅ. मंगेश गुलवाडे, डाॅ. करमरकर, डाॅ. भलमे, डाॅ. मुंधडा, दामोदर मंत्राी, डाॅ. किर्तीवर्धन दिक्षीत, जि.प. सभापती ब्रिजभुषन पाझारे, माजी स्था.स. अध्यक्ष रामु तिवारी, पुर्व उपमहापौर संदीप आवारी, युवा नेते मोहन चैधरी, कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर, श्यामल अहीर, विनय व अजेय कालीदास अहीर, महेश अहीर यांचेसह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती.
याप्रसंगी ना. हंसराज अहीर यांनी आपल्या मनोगतात या कार्यक्रमामागील भावना विषद करतांना सांगीतले की, स्व. कालीदास अहीर यांनी कमल स्पोर्टींग क्लबच्या माध्यमातून रक्तदान चळवळीला अशा कार्यक्रमाचे आयोजन करून सतत प्रोत्साहन दिले. त्यांच्या या कार्याला समाजोभिमुखतेची जोड देत दरवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करून त्यांच्या कार्याच्या स्मृती जाग्या करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगीतले.
आ. नानाभाऊ शामकुळे यांनी ना. हंसराज अहीर यांनी या महानगरात व जिल्हîात रक्तदान चळवळीला दिशा देण्याचा हेतूपुरस्सर यशस्वी प्रयत्न केला. गत तिन दशकांपूर्वी गरजु रूग्णांना रक्तदाते उपलब्ध होतील असा प्रयत्न त्यांनी पक्षाच्या माध्यमातून केला होता. आज स्वंयस्फुर्तीने युवक युवती रक्तदान करण्यास पुढे येतात हे या कार्याचे फलीत असुन आपल्या बांधवाच्या जन्मदिनी असे आयोजन करून त्यांनी समाजापुढे नवा आदर्श ठेवला असल्याचे ते म्हणाले. त्यांनी कमल स्पोर्टींग क्लबच्या पदाधिकाÚयांचेही या आयोजनाबद्दल प्रशंसा केली.
या कार्यक्रमात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात तैनात केंद्रीय औद्योगीक सुरक्षा दलाच्या तसेच केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी रक्तदान करून या राष्ट्रीय कार्याला हातभार लावला या शिबीरात चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, घुग्घूस, भद्रावती, कोरपना, गडचांदूर, जिवती येथील शेकडो युवकांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. या सर्वांचे केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर व मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्रा व बॅग देवुन सन्मानित करण्यात आले. हरिशचंद्र अहीर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमात शासकिय रूग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. किर्ती साने, डाॅ. शिवानी, सौ. वर्षा देशमुख, पंकज पवार, संजय गावीत, अपर्णा रामटेके, जय पचारे, साहेबराव हिवरकर, राकेश ठेंगरे, शारदा लोखंडे, राकेश दुर्याेधन, राजु खिरटकर, वैशाली गेडाम, लक्ष्मण नगराळे, देवेंद्र कुडवे, रूपेश घुमे तसेच डाॅ. हेडगेवार रक्तपेढी, नागपूरच्या रक्त संक्रमण चमुचाही भेट वस्तू व प्रमाणपत्रा देवुन विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास नगरसेविका आशा आबोजवार, माया उईके, शितल कुळमेथे, शिला चव्हान, शितल आत्राम, चंद्रकला सोयाम, छबु वैरागडे, शितल गुरूनुले, कल्पना बगुलकर, संगीता खांडेकर, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, राहुल घोटेकर, झोन सभापती श्याम कनकम, तेजा सिंग, राहुल बोरकर, मनोज गौरकार, अभिनव लिंगोजवार, राहुल गायकवाड, मुकेश यादव, मयुर झाडे, प्रणय डंबारे, शिवम त्रिवेदी, सलमान शेख, प्रभा गुड्दे, स्मिता नंदनवार, विकास खटी, प्रमोद शास्त्राकार, स्वप्नील मुन, श्रीकांत भोयर, प्रा. रवी जोगी, विनोद शेरकी, यांचेसह अनेकांनी शिबीराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास भाजपा, भाजयुमो व कमल स्पोर्टींग क्लबचे पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.