राष्टीय ओबीसी महासंघाचे उद्घाटन करताना महाराष्ट राज्याचे मुख्यमंञी मा ना.देवेद्र फडणविस यांचे स्वागत करताना राष्टीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मा बबनराव तायवाडे त्यावेऴी राज्याचे ऊर्जामंञी बावनकुळे, सर्व मान्यवर.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन
मुंबई - राज्य सरकार ओबीसींच्या विकासासाठी बांधील आहे. त्यांना त्यांचे अधिकार मिळावेत यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी दिले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात ते बोलत होते.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. राज्यात ओबीसींला किती प्रतिनिधित्व मिळाले, यांची संपूर्ण माहिती लवकरच जाहीर केली जाईल. तसेच नॉन क्रिमिलेयरमधून ओबीसींना बाहेर काढण्यासाठी मागास आयोगाला काम देण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
माझ्या मतदारसंघातील ओबीसीच्या मतांमुळेच मी आज मुख्यमंत्री आहे. त्यांनी मते दिली नसती तर मी आज येथे नसतो, त्यामुळे ओबीसींच्या विकासासाठी मी व्यक्तीश: बांधील आहे. त्यांना त्यांचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत. यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.