नवी दिल्ली :
1. केंद्रीय अर्थमंत्री श्री. अरूण जेटली आज संसदेत पुढील आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडत आहेत. यावेळी बोलताना श्री. जेटली म्हणाले की, सरकारनं राबविलेल्या अनेक सुधारणा आणि कल्याणकारी योजनांमुळं देशाची अर्थव्यवस्था जगभरात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. तसंच, वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू केल्यामुळं अप्रत्यक्ष कर पध्दती अ धिक सुलभ झाली आहे. उत्पादन क्षेत्र पुन्हा पूर्वपदावर येत असून, यावर्षी निर्यातीत 15 टक्के वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. थेट विदेशी गुंतवणूक वाढली असून, देशात व्यापार करण्यात सुलभता आली असल्याचं देखील श्री. जेटली यांनी सांगितलं.
2. 42 मेगा फुड पार्क, मत्सपालन, पशुपालनासाठी या अर्थसंकल्पात दोन नवीन निधींची तरतूद केली आहे. हवेचं प्रदूषण टाळण्यासाठी नवीन योजना अंमलात आणण्यात येणार आहेत. आगामी वर्षात दोन करोड शौचालयांची निर्मिती, 2022 पर्यंत प्रत्येक गरीब व्यक्तीला स्वतःचं घर मिळेल यासाठी 51 लाख घरं ग्रामीण भागात बांधण्यात येणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं. स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार देण्यासाठी आपलं सरकार कटीबध्द असल्याचं सांगून श्री. जेटली म्हणाले की, गरीबी कमी करणं नवीन आणि भक्कम भारताच्या निर्मितीसाठी सरकार वचनबध्द आहे.
3. नवीन संगणकीय चलन अर्थात ई-वे बिल प्रणाली देशभरात आजपासून लागू करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक मालवाहतुकदाराला दहा किलोमीटर पुढच्या प्रवासासाठी त्याचप्रमाणे पन्नास हजार रुपये एवढ्या किमतीच्या मालासाठी हे ‘ई’ चलन आपल्या बरोबर बाळगणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
4. लातूर जिल्ह्यात उपनगरी रेल्वे डबे तसंच, मेट्रो बोगी कारखाना उभारण्यास रेल्वे मंत्रालयानं मान्यता दिली आहे. रेल्वेमंत्री श्री. पियुष गोयल यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही माहिती दिली.
5. दिल्ली इथं सुरू असलेल्या भारत खुल्या मुष्टीयुध्द स्पर्धेत भारताच्या एम.सी. मेरीकाॅमनं 48 किलो वजन गटात अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता तिचा सामना फिलिपाईन्सच्या जोस गाबुको बरोबर होईल.
6. भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान आजपासून सहा एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होत असून, आजचा पहिला सामना डरबन इथं खेळला जाणार आहे.