সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 11, 2017

पेंच पाणीबाणी वर उपाययोजना थंडबस्त्यात


  • जलसंपदा विभागाने अद्याप प्रस्तावच तयार केला नसल्याचा आमदार रेड्डी यांचा आरोप
  •  
रामटेक तालुका प्रतिनिधी-
पेंचच्या तोतलाडोह धरणात चैरई धरणामुळे व सातत्याने होत असलेल्या कमी पर्जन्यमानामुळे करावयाच्या उपाययोजनांचे प्रारूप अद्याप तयार केले नाही.जलसंपदा विभागाने या प्रस्तावीत उपाययोजनांचे प्रस्ताव तयार करून करून राज्य षासनाची त्यास प्रषासकीय मंजुरी तात्काळ घेणे गरजेचे आहे मात्र अद्यापही संबधित विभागाने तसा प्रस्तावच तयार केला तयार केला नसल्याचा आरोप रामटेकचे आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रामटेक येथे स्थानीक बातमीदारांषी बोलतांना केला.रामटेकच्या ग्रीनलॅड रिसोर्ट येथे दिनांक 10 डिसेंबर 2017 रोजी आयोजित पत्रपरीशदेत त्यांनी ही माहीती दिली.
जलसंपदा विभागाने प्रस्तावीत उपाययोजनांचे प्रस्ताव तयार करणे व त्यास आवश्यक असलेली प्रषासकीय मान्यता व तांत्रीक मान्यता घेवून प्रत्यक्ष कामे करण्यास अक्षम्य दिरंगाई करीत असल्याने भविश्यात पेंच लाभक्षेत्रांतील षेतकरी आगामी अनेक वर्शे अडचणित आल्याषिवाय राहणार नाहीत असा ईषाराही आमदार रेड्डी यांनी यावेळी दिला.नागपुरच्या विधानसभा अधिवेषनांत आपण हा मुद्दा प्रखरपणे मांडणार असल्याचेही त्यांनी बातमीदारांना सांगीतले.यासाठी आपण सातत्याने षासनस्तरावर पाठपुरावा करीत असल्याचेही ते म्हणाले.
रामटेकच्या 150 कोटी रूपयांच्या विकास आराखडयास राज्य षासनाने मंजुरी प्रदान केल्याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले मात्र अद्यापही निधी मीळाला नसल्याने या अधिवेषनात किमान 50 कोटी रूपयांचा पहीला हप्ता मीळावा यासठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.रामटेकच्या अंबाळा वळणावर गेल्या अनेक वर्शांपासुन बांधून तयार असलेल्या पर्यटनविभागाच्या माहीती व सेवा केंद्राचे लोकार्पण कधी करणार या प्रष्नाच्या उत्तरांत ते म्हणाले की,याठीकाणी बांधकामात अनेक त्रुटी असल्याने व काही नविन कामे त्यात आपण प्रस्तावीत केली होती त्यास राज्य सरकारने 1 कोटी 21 लक्ष रूपयांचा निधी मंजूर केला आहे व ती सर्व कामे झाली की त्यानंतर या वास्तुचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
रामटेक विधानसभा क्षेत्रांतील रामटेक तालुक्यांतील कोरडवाहू भागात मामा,लघुसिंचन व अन्य मोठे तलाव असुन त्यांची संख्या सुमारे 52 असून याद्वारे 5000 एकर क्षेत्र सिंचनाखाली येवू षकते मात्र हे सर्व तलाव अतिषय वाईट अवस्थेत आहेत यांची दुरूस्ती आवष्यक आहे व यासाठी
मोठया निधीची आवष्यकता आहे.या सर्व तलावांचे सक्षमीकरणासाठी आपण सातत्याने षासनाकडे पत्रव्यवहार करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
मनसर येथील टोलनाका हा बेकायदेषीर असून गेली अनेक वर्शे तो सुरू आहे याबद्दल नामदार नितीन गडकरी यांचेसह संबधित अधिकारी यांचेसोबत दिल्ली येथे 14/08/2017 रोजी बैठक झाली व त्यात ठरल्याप्रमाणे हा टोलनाका बंद करावा यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत व लवकरच हा टोलनाका योग्य जागी स्थानांतरीत करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.
संस्कृत विद्यापीठाचे नागपुर येथे सुरू असलेले षैक्षणिक संकुल रामटेक येथे स्थानांतरीत करण्यात यावे यासाठी आपण प्रयत्नषील असुन राज्याचे षिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांचेषी याबाबत आपण चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले.
नागपुर येथे दिनांक 2 डिसेंबर 2017 रोजी संपन्न झालेल्या खनिज विकास निधी प्रतिश्ठानच्या बैठकीत रामटेक विधानसभा क्षेत्रांतील खनन परीसर गावातील षेती पांदन रस्त्याची कामे प्रस्तावीत करण्यात आली असून यासाठी 2017-18 अंतर्गत 10 कोटी रूपये निधी मंजूर करण्याची आपण मागणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
नागपुरचे अधिवेषन केवळ सहल अधिवेषन ठरू नये.विदर्भाच्या विकासाचे प्रष्न या अधिवेषनांत चर्चिले गेले पाहीजे व यासाठी आपण प्रयत्नषील असून आपल्या विधानसभा क्षेत्रांतील प्रलंबित प्रष्न आपण निष्चितच मार्गी लावू असा आषावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पत्रपरीशदेला रामटेकचे नगराध्यक्ष दिलीप देषमुख,तालुका भाजपाचे अध्यक्ष ज्ञानेष्वर ढोक,खैरी बिजेवाडाचे उपसरपंच चरणसिंग यादव,न.प.रामटेकचे बांधकाम सभापती संजय बिसमोगरे,न.प.सदस्य विवेक तोतडे,भाजपाचे नागपुर जिल्हा उपाध्यक्ष राजेष ठाकरे,माजी नगरसेवक हुसेन मालाधारी,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल किरपान आदी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.