कनिष्ठ महाविद्यालयाला कुलुप लावून तहसीलदार यांना निवेदन
ब्रम्हपुरी ग्रामीण प्रतिनिधी : गुलाब ठाकरे
महाराष्ट्रातिल विनाअनुदानित असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा ,कनिष्ठ महाविध्यालयातिल शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी मागील १५वर्षापासून शासनाचा रुपया न घेता विध्यादानाचे काम करीत आहेत.अशा परस्थितित अक्षरशः उपासमारीची पाळी आली असून ""शिक्षण हे विनोदाच्या तावडीत सापडलय ""तर या सापडलेल्या शिक्षण व्यवस्थेला बाहेर काढण्याकरिता शासनान तातडीने शंभर टक्के करून देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानीत कृती समितिच्या कर्मचारी यानी कंबर कसुन कनिष्ट महाविद्यालयाला कुलुप लावून हिवाळी अधिवेशन नागपूर ला गेले आहेत. तसेच तहसीलदार याना निवेदन देऊन बेमुदत बंदचे आवाहन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कर्मचारी विनाअनुदानीत सर्व उच्च माध्यमिक , कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीचे राज्याध्यक्ष मा.श्री.तानाजी नाईक यांच्या नेतृत्वात बेमुदत बंदचा बंड पुकारण्यात आला.सर्व शिक्षकोंत्तर कर्मचारी मोर्चात हजर होते तर तहसीलदार याना निवेदन देताना श्री.गोवर्धन दोनाडकर , मनोज आलबनकर , सौ .शारदाताई ठाकरे, विशाल गुंफावार.संदीप ढोरे, राजेंद्र देसाई , एच.के.बगमारे , एस.व्ही.खोब्रागडे, व्ही.व्ही.बागडे , निकोडे', चोपकार, आर, आय, कार , टिकले, हर्षद नंदेश्वर,सौ नागमोती , व राऊत आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.अशी माहिती मा.श्री. गोवर्धन दोनाडकर यानी दिली.