चंद्रपूर/प्रतिनिधी:
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी (ता. १२) दुपारी सविता आत्राम या महिलेची प्रसूती झाली. तीन तासांनंतर महिलेला तिचे बाळ देण्यात आले. बाळ आपले नाही. त्याची अदलाबदल करण्यात आली आहे, असा आरोप या महिलेने केला असून बाळ स्वीकारण्यास तिने नकार दिला. तिच्या पतीने याची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सविता आत्राम राजुरा तालुक्यातील विरूर येथील रहिवासी आहे. सोमवारी (ता. ११) दुपारी १२.३० वाजताच्या सुमाराला तिने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बाळाला जन्म दिला.