कन्हान क्षेत्रात बायकर्सच्या बुलेट मुळे नागरिक त्रस्त ;
सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
पारशिवणी / प्रतिनिधी:
तालुक्यातिल
शहर ते ग्रामीण भागात बुलेट धारक बायकर्सच्या कर्कश आवाज,सायलेन्सरने
फुटणार्या फटाक्यांन सोबत स्टंटबाजीमुळे क्षेत्रातिल नागरिक त्रस्त झाले
असून,या बुलेट्स धरकांन मुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुनःश्च ऐरणीवर आलेला
आहे.महत्वाचं म्हणजे विद्यालये,महाविद्यालय सुरू होणे व सुटण्याच्या
सुमारास तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेले बुलेटधारी रोडरोमिओ जाणूनबुजून
विद्यालय,महाविद्यालयान समोर चलबिचल करतात ज्यामुळे विद्यार्थिनींना नाहक
मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र क्षेत्रात दिसून येत आहे.या
पार्श्वभूमीवर कन्हान पोलिसांनी विद्यालयाच्या वेळेत परिसरात गस्त
घालण्याचे नितांत गरज असल्याचे गांभीर्य लक्ष्यात घेणे महत्वाचे आहे.
नागपूर-जबलपूर
हा महामार्ग अत्यंत वर्दळीचा आहे.कन्हान शहरात बाजार,दुकाने,फळांची दुकाने
ही जागे अभावी महामार्गाच्या कडेला लागतात ज्यामुळे शहरात नेहमीच गर्दी
असते अश्यात शहरातून शालेय विद्यार्थी,जड वाहतूक,ट्रक,बस यांची आवाजाही
पायदळ व दुचाकीने चालणाऱ्यांच्या मधात बुलेट गाड्या सैराट होऊन विचित्र
पद्धतीने चालविण्याचे प्रकार शहरात घडत आहेत.युवा वर्गाने दुचाकींना
वेगळ्या आणि विचित्र प्रकारचे सायलेन्सर बसविलेले आहेत.त्यामुळे बुलेट मधून
विचित्र आणि कर्कश आवाज निघतात. ज्याने क्षेत्रातील ज्येष्ठ
नागरिक,शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थि या प्रकाराने जाम वैतागल्या
आहेत.राष्ट्रीय महामार्गाने बाईक स्टंट करणाऱ्यां च्या सँख्येत देखील वाढ
झाली असून सुसाट सुटणाऱ्या बुलेट्स ने अपघाताची शक्यता नाकारता येत
नाही.नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील राष्ट्रीय महामार्ग
४४ चे रुंदीकरनाचे कार्य कांद्री टेकाडी सीमेअंतर्गत प्रगती पथावर आहे.तर
कन्हान ते कन्हान रेल्वे क्रॉसिंग मधील काम सुरू होण्याच्या मार्गावर
आहे.अश्यात महामार्गाच्या रुंदीकरण कार्य सुरू असताना रस्त्याने बुलेट चालक
जर वाहतूक नियम धाब्यावर ठेवून बुलेटचा वापर करत असेल तर साधारण
माणसांच्या जीवाला धोका असल्याचे संकेत नाकारता येणार नाही.
महाविद्यालयांसमोर
बुलेट दुचाकीचा सर्रास वापर करीत चकरा देणारे रोडरोमिओ,बुलेटच्या हॉर्नचा
कर्कश आवाज,सायलेन्सरमधून फटाक्याच्या आवाजाचा बार उडवणे त्यामुळे ज्येष्ठ
नागरिकांना नाहक त्रास होऊ लागला आहे.अश्या रोडरोमिओंच्या कोणीही बळी पडू
नये या उद्देशाने कन्हान पोलिसांनी या विषयाकडे लक्ष देत अश्या सैराट
बाईकर्स वर कार्यवाहीचा बडगा उगारने अत्यंत महत्वाचे झाल्याचे स्वर
क्षेत्रातील नागरिकांनी काढायला सुरवात केली आहे.