সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 11, 2017

कार्यकारी अभियंताच्या डोक्यावर लोक प्रतिनीधीचा हात

  • - तक्रारी करूनही देयक काढलीत
  • - शहरातील रस्ता व नाली बांधकाम
  •  
चिमुर तालुका प्रतीनिधी
           चिमुर नगर परिषदच्या तिन वर्षाच्या कालावधीत परीसरातील पायाभूत सुविधा व  विवीध प्रभागाच्या विकासाकरीता करोडो रुपयाचा निधी आला आहे.विकास कामाला सुरवात झाली. नगर परिषद ने ही सर्व कामे सार्वजनीक बांधकाम विभागाला वळते करून बांधकाम विभागाच्या अधीनस्त असलेल्या ठेकेदाराला देन्यात आली. प्रभागातील सर्वच विकासकामे निकृष्ठ झाली. या संदर्भात अनेक लेखी तक्रार कार्यकारी अभियंता नेवारे यांना करन्यात आल्या मात्र कार्यकारी अभियंताने कुठल्याही प्रकारची सखोल चौकशी न करता परस्पर विकास कामाची देयक काढली . निकृष्ठ बांधकामास प्रोत्साहन करनाऱ्या कार्यकारी अभियंताच्या डोक्यावर लोक प्रतीनीधीचा हात असल्याने कंत्राटदार व कार्यकारी अभियंता यांनी विकास कामाविषयी बांधकामात मोठा आर्थीक घोळ केल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक विनोद ढाकुणकर यांनी केला आहे.
          नगर परिषद क्षेत्रात  पायाभूत नागरी सुविधा वैशीष्ठपूर्ण योजना अंतर्गत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम आदी प्रकारची विकास कामे सतरा प्रभागात सरू आहेत. तर काही प्रभागातील कामे पूर्ण झाली आहे. नगर परिषद ने हि सर्व प्रकारची कामे सार्वजनीक बांधकाम विभागाला वळते केले असुन बांधकाम विभाग मार्फत एकाच कंत्राटदाराला क्लब च्या माध्यमातुन कंत्राट मिळवुन  देन्यात आले. याच कंत्राटदाराने क्रांती नगर, चिमुर- चावळी रस्ता, सातनाला -वेलकम कॉलनी, राजीव गांधी नगर - शिक्षक कॉलनी, या भागात रस्ता व नाली बांधकाम ची कामे पूर्ण केली. मात्र सहा महीन्यातच रस्ता उखळून गिट्टी बाहेर पडली आहे. रस्त्याला भेगा पडल्या आहेत.नाली बांधकामात मटरेलची कांन्टीटी, नाल्याचा उतार , नाली सरळ न करता आळी - मोळीने बांधकाम केले आहे. ही सर्व कामे निकृष्ठ दर्जाची झाली आहे. या संदर्भात नगर परिषद ने ५ नोव्हेबर २०१७ ला सभा बोलवुन या प्रकरनाचा ठराव घेतला होता. व काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्रिपक्षीय चौकशीची मागणी केली होती.
           नगर परिषदच्या तिन वर्षाच्या कालावधीत  निकृष्ठ बांधकामाच्या अनेक तक्रारी कार्यकारी अभियंताकडे करन्यात आल्या तक्रारीची शहानिशा न करता कार्यकारी अभियंताने कंत्राटदाराची देयके काढली. हे प्रकरण संशयास्पद असून नेवारे यांना राजकीय आर्शीवाद असल्याचे दिसून येत आहे. तसे असुन काही महिन्यात कार्यकारी अभियंता निवृत्त होत असल्यामुळे निवृत्ती निधी गोळा तर करत नाही ना..? असा प्रश्न शहरात चर्चील्या जात आहे.
              शहरातील प्रभागात झालेल्या निकृष्ठ कामाविषयी तक्रारी देवुन दोन वर्षाचा कालावधी लोटला. या दरम्यान चंद्रपुर जिल्ह्याचे जिल्हाधीकारी चिमुर दौऱ्यावर आले असता त्यांना सुद्धा या प्रकरणाविषयी निवेदण व तक्रार काँग्रेस नगरसेवकांनी दिली. मात्र जिल्हाधीकाऱ्यांनी अजुनपर्यत कुठल्याही चौकशीचे  आदेश नगर परिषद ला दिले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय वरदहस्त लोकप्रतीनीधीचा हात कार्यकारी अभीयंताच्या डोक्यावर असल्यामुळे निकृष्ठ बांधकामाच्या तक्रारीची चौकशी न करता मनमानी कारभार करीत असुन लोकप्रतीनीच्या दबावात देयक काढली असल्याचा आरोप करत निकृष्ठ बांधकामास प्रोत्साहन देनाऱ्या कार्यकारी अभियंता नेवारे यांची चौकशी करून कारवाई करन्याची मागणी कॉंग्रेस चे नगरसेवक विनोद ढाकुनकर यांनी केली आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.