সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 07, 2017

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

 

पारशिवणी तालुका

@ ग्राम पंचायत टेकाडी ( को.ख.) येथे डॉ. बाबासाहेबाना अभिवादन
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमितत्त ग्राम पंचायत टेकाडी कोयला खदान येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला ग्राम पंचायत सरपंच सुनीता मेश्राम यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन केल्या गेल्या कार्यक्रमाला ग्राम पंचायत सरपंच सुनीता मेश्राम,ग्राम विकास अधिकारी भारत मेश्राम,ग्राम पंचायत सदस्य,दिनेश चिमोटे,सिंधुताई सातपैशे,मीना झोड,दुर्गा राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती तर ग्रामस्थांमध्ये  सुकेशनी भोवते,विलास सावरकर,राजू गुरधे,आशिष झोड,मनोज मोहाडे,पंकज हूड हे उपस्थित होते संचालन मनोज मोहाडे यांनी तर आभार विलास सावरकर यांनी मानले


@ काँग्रेस कन्हान तर्फे अभिवादन
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे कन्हान काँग्रेस पक्षातर्फे बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले सोबत प्रतिमे समक्ष बुद्धवंदना करण्यात आली या वेळी काँग्रेस पक्षाचे नगर परीषद कन्हान सदस्य नरेश बर्वे,राजेश यादव शहर काँग्रेसचे बकाराम भोयर,सतीश भसारकर,प्रमोद बांते,शक्ति पात्रे,आकीब शिद्दीक़ी,अमोल प्रसाद,मिल्लिन्द वाग्धरे,मनीष भिवगड़े,अमर पात्रे,शरद वाटकर,गौरव माहोरे,सतीस पाली,लाला चौरे,गौत्तम नितनवरे,
काका नारनवरे,मधुकर गनवीर यांची उपस्थिती होती.

@ कन्हान येथे महापरिनिर्वाण दीना निमित्त कँडल रैली चे आयोजन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निम्मित पंचशील बुद्ध विहार सत्रापुर मधून कँडल रैली काढण्यात आली  रैलि मध्ये बुद्ध उपासक व उपासिकांनी कँडल घेऊन आंबेडकर चौक कन्हान स्थित विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर कँडल लावून बुद्ध वंदना करून  बाबासाहेबां चा जय घोष करीत महामानवाला अभिवादन केले प्रसंगी प्रमुख्यात चंदन मेश्राम ,समीर मेश्राम, सुरेश वाघमारे, अजय चौहाण,महेन्द्र साबळे, संदिप कभे, कामेश्वर शर्मा, नरेश रामटेके, सुरेश देवांगण, अंकित बचले, रितीक कापसे, स्वप्नील वागमारे, ऋषभ बावनकर, भारती वासनिक , बेबी रंगारी, मीना मोटघरे, नरेश सोनेकर, रजनीश मेश्राम श समाजबांधव उपस्थित होते.


सालवा स्थित महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन 
 श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्ट्स महाविद्यालयात  ता.०६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण व ‘एडस जनजागृती दिन’ असा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दरम्यान  महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य प्रा.सचिन वानखेडे यांनी प्रास्ताविकातून बाबा साहेबांना अभिवादन केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व्याख्याते प्रा.मयूर कातोरे यांनी अभिवादन करत त्यांच्या समाजासाठी केलेल्या संघर्ष जीवन चरित्रावर प्रकाश टाकत डॉ.आंबेडकरांचे तत्वज्ञान व सध्या परिस्थितीशी त्यांचा परस्पर संबध त्याचे पुढे होणारे संभाव्य परिणाम यावर व्यापक व अभ्यासपूर्ण प्रकाश आपल्या व्याख्यानातून टाकला.त्यानंतर ०१ डिसेंबर ते ०७ डिसेंबर पर्यँत चालणार्या एड्स जनजागृती सप्ताह बाबद प्रा.प्राची अणे यांनी एड्स या विषया बाबद विध्यार्थाना मार्गदर्शनात बोलताना आपल्या कुटुंबात,गावात समाजात वावरताना विद्यार्थ्यांनी समाजातील एड्स बाबद बुरसटलेल्या विचारधारेच्या विरोधात सजग पणे उभे राहून एड्स बद्दल लोकांच्या मनात बैसलेला गैरसमज काढून त्यांना सत्यता पटवून सांगण्यावर भर दिला.कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी प्राचार्या डॉ.सुप्रिया पेंढारी तर प्रमुख उपस्थितीत प्रा.अतुल गावस्कर,प्रा.रंजना धोटे,प्रा.प्राची अणे,प्रा.मयूर कातोरे हे होते. संचालन कु.सविता महादुले आभार कु.अश्विनी बरबटे ह्यांनी मानले.कार्यक्रमाल महाविद्यालतील विद्यार्थ्यांन सह रामेश्वर नागपुरे,नितीन केरेमोरे,पंकज वांढरे,डीमू महल्ले,खुशाल शेंडे हे उपस्थित होते.

# भाजपा अनु.जाती मोर्चा कन्हान शहर तर्फे अभिवादन
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे कन्हान काँग्रेस पक्षातर्फे बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले सोबत प्रतिमे समक्ष बुद्धवंदना भाजपा कन्हान शहर अनु.जाती मोर्चा अध्यक्ष हर्ष पाटिल यांच्या नेतृत्वात करन्यात आली
कार्यक्रमाल प्रमुख उपस्थित कन्हान नप. उपाध्यक्ष मनोहरजी पाठक,अडॅ.आशाताई पणिकर,स्वतीताई पाठक, जयराम मेहरकुड़े, रिंकेश चवरे, विनोद किरपान, अजय लोंढे, मनोज क़ुरडकर, अमोल साकोरे, राजेन्द्रजी फुलझेले, राजा शेन्द्रे, अजय चव्हाण, हर्ष पाटिल, लक्ष्मीताई लाडेकर, संगीताताई खोब्रागडे, अनिताताई पाटिल, चंदन मेश्राम,ऋषभ बावनकर, अतुल हजारे, मुलचंदजी शिन्देकर, शैलेश शेडकी, लीलाधर बर्वे, वीर सिंग, गौरव माहोरे, सुरेश देवांगन, कामेश्वर शर्मा, सुरेश कंळबे, विनय यादव, किरण ठाकुर, सुनील लाडेकर, मयूर माटे, राहुल चांदुरकर,महादेव लिल्हारे, महेंद्र चव्हाण, विक्रांत भटेरो, हितेश भगत यांच्या सह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
ब्रम्हपुरी तालुका
ब्रम्हपुरी :-  राज्यघटनेचे शिल्पकार महामानव , बोद्धीतत्व  , प्रज्ञासूर्य  , विश्वरत्न ' भारतरत्न,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त   डॉ.पंजाबराव देशमुख कनिष्ट कन्या महाविध्यालयात साजरा करण्यात आला.
डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी दिन',  दलित, पीड़ित अस्पृश्य यांच दुख व दारिद्रय दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले.भारतीय संविधानाच परिणाम म्हणून आज भारत देशाल जगातील सर्वश्रेष्ठ अशी लोकशाही नांदत आहे.या संविधानामुळे भारतीय जनतेला खऱ्या अर्थाने मानवी हक्क प्राप्त झाला आहे l.अशा क्रांतीसूर्य विश्वरत्न भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श डोळ्यासामोर ठेवून कार्य करीत राहा.त्यामुळे आपल्याला यश माती नक्की मिळेल असे आवाहन मा.श्री.गोवर्धनभाऊ दोनाडकर यानी केले.
 भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ .पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपूरी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाची अध्यक्ष प्राचार्य शारदाबाई ठाकरे प्रमुख अतिथि प्रा.कु.एच.के.बगमारे, प्रा.व्ही.व्ही.बागडे, प्रा.खोब्रागडे , वानखेडे बाई आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन कु.अंकीत घुबडे तर आभार प्रदर्शन प्रणाली ढोंगे यानी केले.

चिमूर तालुका

    महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा भारताच्या पृथ्वीतलावर जन्म झाला तो,या देशातील रंजल्या गांजल्या व शोषित पीडित,अन्याय अत्याचारग्रस्त असलेल्या समस्त मानव जातीच्या,सर्वकस कल्याणासाठी.म्हणूनच युगपुरुष डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या अंतीम क्षणापर्यंत, भारतीय समाज व्यवस्थेतील सर्व मानव कल्याणासाठी अहोराञ संघर्ष केला.बाबासाहेबांच्या त्यागाचा व परिश्रमाचा परिपाक असा ठरला कि,आज सर्व समाज घटकातील मनुष्यप्राणी स्वाभिमानाचे आणि आत्मसन्मानाचे जीवन जगतो आहे.परंतु सर्व मानव कल्याणासाठी डाॅ. बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची जाणीव अजूनतरी भारतातील बहुतांश जनतेला नाही.म्हणून या युगप्रवर्तकाचे महान कार्य हिरहिरने समजावून सांगण्यासाठी सर्वोपरी क्षमतावान बना असे आव्हान,कोटगाव येथे पार पडलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य पञकार प्रदीप रामटेके यांनी समाजबांधवांना केले.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौध्दपंच कमेटी अध्यक्ष गुणवंत जांभुळे होते तर मार्गदर्शक म्हणून  पञकार प्रदीप रामटेके,ग्रामसेवक चंद्रशेखर पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.सत्कार मुर्ती म्हणून  पञुजी रामटेके,चिमनाजी शेंडे,दादाजी खोब्रागडे,सौ.तानाबाई हरी राऊत,श्रिमती गिरजाबाई महादेव रामटेके,श्रिमती सुगंधाबाई राजेराम रामटेके,श्रिमती सुगंधाबाई वक्टूजी रामटेके,हे सुद्धा उपस्थित होते.
      प्रदीप रामटेके यांनी उपस्थितांंना मार्गदर्शन करतांना,देशातील राजकीय व सामाजीक चिञाचे वस्तुस्थितीवर आधारीत अवलोकन केले व स्वहितासाठी आणि स्वकल्यांणासाठी सदैव सर्तक,जागृक राहण्याचे आग्रहपूर्वक सांगितले.ग्रामसेवक चंद्रशेखर पाटील यांनी धम्मावर प्रकाश टाकला.
     कार्यक्रमाचे सुञसंचालन अस्मीत रामटेके यांनी केले तर आभार शुभंम शेंडे यांनी मानले.बुध्द वंदनेचे सामुहिक कार्य रुस्तम खोब्रागडे यांनी पार पाडले.दिपप्रज्वलीत करुन उपक्षम रामटेके,पंकज रामटेके,किरन रामटेके,मीना रामटेके व इतरांनी,महामान डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना व तथागत भगवान बुध्दांना,विनंम्र अभिवादन केले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.