সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, December 06, 2017

गडचिरोलीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली – जिल्ह्यातील अहेरीच्या कल्लेड जंगलात आज पहाटे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात पोलिसांनी 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. मृतांमध्ये पाच पुरुष आणि दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. घटनास्थळावरुन शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला असल्याचे सुत्रांनी सांगितले. 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर नक्षलवादी पीएलजी सप्ताह सुरु केला होता. या पार्श्वभूमिवर राज्यातील अधिकारी गडचिरोलीत गेल्या 8 दिवसांपासून तळ ठोकून होते. त्यांचे नक्षलींच्या हालचालींवर बारीक लक्ष होते. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे.

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उपपोलिस ठाण्यांतर्गत कल्लेड येथील जंगलात आज भल्या सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ७ नक्षल्यांचा खात्मा केला. यात ५ महिला, तर २ पुरुष नक्षल्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे मागील महिन्यात ५ निरपराध नागरिकांचे हत्यासत्र चालविणाऱ्या नक्षल्यांना जबर फटका बसला आहे.

कल्लेड जंगलात नक्षल्यांचे शिबिर सुरु असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर सी-६० पथकाचे कमांडर मोतीराम मडावी यांच्या नेतृत्वातील पथक त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केलाच नक्षलवादी जंगलात पसार झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता त्यात ५ महिला व २ पुरुष नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी नक्षल्यांची शस्त्रे व अन्य साहित्यही ताब्यात घेतल्याची माहिती आहे. घटनास्थळी हेलिकॉप्टर पाठविण्यात आले असून, मृतदेह दुपारपर्यंत पोलिस मुख्यालयी आणण्यात येणार आहेत. घटनास्थळी वरिष्ठ कॅडरचे नक्षलवादी असावेत, असा अंदाज आहे.
२ डिसेंबरपासून नक्षल्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मीचा १७ वा स्थापना सप्ताह सुरु झाला आहे. या सप्ताहापूर्वीच नक्षल्यांनी संपूर्ण जिल्हाभरात उच्छाद मांडून पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन ५ नागरिकांची हत्या केली. शिवाय कोटगूल येथील भूसुरुंगस्फोटात हवालदार सुरेश गावडे, तर टवे येथील जंगलात झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे जवान मंजुनाथ शिवलिंगप्पा हे शहीद झाले. त्यानंतर पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस महासंचालक डी.कनकरत्नम व पोलिस महानिरीक्षक शरद शेलार हे जिल्ह्यात तळ ठोकून बसले असून, नक्षल्यांची हालचालीवर बारिक लक्ष ठेवून पोलिसांना मार्गदर्शन करीत आहेत. आज त्यांच्या मार्गदर्शनात ७ नक्षल्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अलिकडच्या काळातील सी-६० पथकाने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.