সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, December 09, 2017

विकासापासुन अजूनही विदर्भ अपेक्षितच?

गोविंदराव भेँडारकर
विदर्भवादी अँड गोविंदराव भेँडारकर
ब्रम्हपुरी- असमतोल दूर करायचा असेल, तर लहान राज्यांच्या निर्मितीचा विचार व्हायला हवा. महाराष्ट्राच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांत विदर्भाचा विकास किती प्रमाणात झाला याचा जर आढावा घेतला, तर विकासापासून अजूनही विदर्भ
उपेक्षितच आहे, हे ध्यानात येते. विकासाचा अनुशेष कमी न होता तो दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्व संपत्तीचे विपुल असलेल्या विदर्भामध्ये विकासाची गती मंद आहे. विदर्भात खनिज संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. एकट्‌या विदर्भात वीजनिर्मितीची चार केंद्रे आहेत.सोळा कोळसा खाण', धान्याचे कोठार , वनसंपत्ती भरपूर प्रमाणात आहेत असे असूनसुद्धा विदर्भाचा 50 वर्षांत विकास का झालेला नाही, याचाही विचार व्हायला हव.
राज्यकर्त्यांनी सदैव विदर्भावर अन्यायच केलेला आहे. विदर्भाला नेहमीच सापत्न वागणूक मिळते. विदर्भाच्या संपत्तीचा विदर्भात उपयोग न होता तो विदर्भाबाहेरच जास्त होतो. मोठे सिंचन प्रकल्प अजूनही आम्ही विदर्भात उभारू शकलेलो नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना सर्वस्वी निसर्गावर अवलंबून रहावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सरळ शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे व त्यांना हवी ती मदत मिळत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडलेला आहे. आज सर्वांत जास्त आत्महत्या विदर्भात आहेत. खेड्‌यापाड्‌यांचा कायापालट अजूनही झालेला नाही. अनेक विदर्भाचे प्रकल्प अडून पडलेले आहेत. त्यामुळे विदर्भाच्या वाट्‌याला उपेक्षितांचे जिणे आलेले आहे.
विदर्भ वेगळा करण्यासाठी आजवर अनेक आंदोलने करण्यात आली, परंतु त्या आंदोलनांना यश प्राप्त झाले नाही. तसा प्रस्ताव देण्याचासुद्धा विचार सुरू आहे; परंतु राजकीय पक्षांचे एकमत होत नाही. विदर्भ वेगळा हवा की नको यासाठी आपली क्षमता चाचपडून पाहण्याची गरज आहे. आजवर ज्या प्रतिनिधींना आपण निवडून दिले, त्यांना जाब विचारण्याची ही वेळ आहे. विदर्भाचा अनुशेष वाढविण्यासाठी जबाबदार कोण? ज्यांच्यावर आपण इतकी वर्षे विश्वास टाकला त्यापैकी स्व.जांबुवंतराव विदर्भाचा मुद्दा शासन दरबारी लावून धरला पण ही ज्योत मावळली.आता त्यांचे अपुरे कार्य पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे.आता आपण निवडून दिलेल्या वैदर्भीय नेत्यांचा करंटेपणाच विदर्भाच्या मागासपणाला जबाबदार आहे. प. महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाचा विकास किती, याची आकडेवारी शासनाने जाहीर करावी. हे सिद्ध होते. परंतु या मागणीला उचलून का धरण्यात आले नाही? याचासुद्धा विचार व्हायला हवा. रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा नेता जांबुवंतरावांव्यतिरिक्त कोणीही नाही. इतर जे नेते विदर्भाचे तुणतुणे वाजवीत आहेत,का असा सवाल निर्माण होत आहे. अशी माहिती विदर्भवादी अँड गोविंदराव भेँडारकर यांनी दिली.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.