शेतीला पूरक जोडधंदे करून शेतकèयांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या
दृष्टीने कृषी विभागातङ्र्के राबविण्यात येणाèया विविध योजना राबविल्या
जातात. आधुनिक शेतीची माहिती शेतकèयांना मिळावी, यासाठी एकाच छताखाली मकृषी
पर्यटनाङ्कच्या माध्यमातून कृषी विभागाची १० एकर पडीक जागा विकसित केली जात आहे. पोलिस
मुख्यालयासमोरून वरोरा नाका चौकाकडे जाणाèया उड्डाणपुलाच्या शेजारी
हा प्रकल्प साकारला जात आहे. एका बाजूने रेल्वेलाइन आणि दुसरीकडे उड्डाणपूल यामुळे
हा प्रकल्प प्रवाशांना मोहित करेल. यात बांबू लागवड, qशगाडा शेती, भात शेती, करवंद, चिकूची झाडे लावण्यात येणार
आहेत. हा प्रकल्प बगीचाच्या स्वरूपाने विकसित केला जात असल्याने तिथे पर्यटकांना भेट
देता येईल. बसण्याची आसने, ङ्किरण्यासाठी पायवाटही तयार करण्यात येणार आहे. सध्या तयार
करण्यात आलेल्या शेततळ्यावर विविध जातींचे पक्षी स्वछंद ङ्किरत असून, भविष्यात पक्ष्यांना पोषक
वातावरण निर्मिती होऊन पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रqबदू ठरेल. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून
कुक्कुटपालन, qशगाडा शेती, दुग्धोत्पादनही येथे केले जाईल. या माध्यमातून विक्री केंद्राची स्थापना करण्यात
येणार असून, रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प साकारण्यासाठी भद्रावती तालुक्यातील शेतकरी बंडू
गोहत्रे आणि कृषी विभागाचे कर्मचारी ठवरे सहकार्य करीत आहेत.
२०० बाय १०० ङ्कुटांच्या शेततळ्यात गेमङ्किqशग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी
शुल्क आकारण्यात येणार असून, हौशींना मासे पकडण्याची संधी मिळेल. येथे विविध जातींचे मासे
सोडण्यात येणार असून, प्रजननाची प्रक्रियासुद्धा केली जाईल. या माध्यमातूनही कृषी विभागाला अर्थार्जन
होईल.
कृषी पर्यटनाची संकल्पना शेतकèयांना मार्गदर्शक आणि अभ्यासासाठी
असली, तरी पर्यटकांनाही
लाभ घेता येईल. पर्यावरणाचा समतोल राखून पक्ष्यांना मुक्तसंचार करण्यासाठी पोषक वातावरण
निर्मिती केली जाईल.
- अशोक कुरील, कृषी अधीक्षक