महारोगी सेवा समितीची स्थापना झाल्यानंतर राज्यसरकारने वरोराजवळील ५० एकर जागा आनंदवनआश्रमासाठी दिली . दत्तपूरच्या कुष्ठधामातूनकुष्ठरोगांच्या सेवेच्या कार्याला सुरुवात झाली .साधनाताई आमटे , डॉ . विकास आमटे , डॉ .प्रकाश यांच्यासह बाबांनी या कामाला सुरुवात केली .२१ जून १९५१ रोजी आचार्य विनोबा भावे तेलंगणाकडेभूदान पदयात्रेसाठी रवाना झालेत . त्याआधीआनंदवनाचे उद्घाटन आचार्यांच्या हस्ते पार पडले . पूर्वी काटेरी वनात असलेली ही संस्था आताकुष्ठरूग्णांसाठी कार्य करणारे वटवृक्ष ठरली आहे .
बाबा आमटे यांच्या कार्यातून आम्हाला प्रेरणा मिळत असते . बाबांनी श्रमगीताच लिहिली आणिप्रत्यक्षात कृतीत आणली . आनंदवनसाठी कार्य करतानाचा अनुभव वेगळाच होता , असे ज्येष्ठकार्यकर्ते तथा महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी ' मटा ' शी बोलताना सांगितले . ' तुमच्यातील ताकद समाजाला दाखवा ', असा संदेश बाबांनी कुष्ठरोगी , अपंगांना दिल्याचेही कडूयांनी सांगितले.
पूर्वी अत्यंत छोट्या वास्तुत कार्यरत असलेल्या आनंदवनाला आता पक्की इमारत , वीज जोडणी ,बँक , पोस् ट ऑफीस , शाळा , कॉलेज , दवाखाने अशा विस्ताराचर साथ लाभली आहे .आतापर्यंत आनंदवनातून २४ लाख विविध पातळीवरील लोकांना सहाय्य मिळाले आहे .
केवळ कुष्ठरुग्णांपुरते आनंदवन मर्यादीत नाही . अंध , अपंग , मूकबधीर , महिलांच्या कल्याणाचेकार्यही येथे केले जाते .
आनंदवनाच्या ध्येय , दृष्टी व उद्द िष्टांना नवा आयाम देण्याची गरज आहे . कुठल्याही नैतिकमूल्यांशी तडजोड न करता भविष्यात आनंदवनाचे कार्य आणखी व्यापक केले जाईल .कौस्तुभ आमटे , सहाय्यक सचिव , महारोगी सेवा समिती