यश बांगडे, रुपम वासेकर, नितीन पेंदाम प्रथम पुरस्काराचे मानकरी
चंद्रपूर : ऑर्बिट सायन्स अॅकडमी ऑङ्क एज्युकेशनच्या वतीने मे महिन्यात घेण्यात
आलेल्या आठवी ते दहावीच्या विद्याथ्र्यांसाठीच्या विज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर झाला
असून, आठवीतून
यश बांगडे, नववीतून रुपम वासेकर, तर दहावीतून नितीन पेंदाम या विद्याथ्र्याने प्रथम क्रमांक
मिळविला.
चंद्रपूर तालुका सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने संचालित येथील
आर्बिट सायन्स अकॅडमी ऑफ एज्युकेशनच्या वतीने १९ मे रोजी स्थानिक मातोश्री विद्यालयात
सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात आठवी, नववी आणि दहावीच्या सुमारे २५० विद्याथ्र्यांना
सहभाग घेतला होता. विद्याथ्र्यांना भावी शैक्षणिक जीवनात स्पर्धा परीक्षा, प्रवेश पूर्व परीक्षांचा
सराव होण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञानावर
आधारित प्रश्न विचारण्यात आले. या स्पर्धेचा निकाल नुकताच संस्थेने जाहीर केला आहे.
यात वर्ग आठवीतून प्रथम यश अविनाश बांगडे, द्वितीय ओशीन यशवंत पाचभाई,
तृतीय शिवानी राजीव
धकाते, वर्ग
नववीतून प्रथम रुपम दिलीप वासेकर, द्वितीय गायत्री राजीव विठोलकर,
तृतीय गौरव लभाने,
वर्ग दहावीतून प्रथम नितीन
रघुनाथ पेंदाम, द्वितीय स्नेहा पांडुरंग बोढाणे, तृतीय सोमेश विनोदराव आदेवार यांचा समावेश आहे.
प्रथम क्रमांकांच्या यशस्वी विद्याथ्र्यांस दोन हजार ५१ रुपये, द्वितीय एक हजार ५१ आणि तृतिय
क्रमांकाच्या विद्याथ्र्यांस ५५१ रुपये बक्षिसासह सन्मानचिन्ह देण्यात येईल. सहभागी
विद्याथ्र्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा लवकरच
आयोजित करण्यात येणार आहे.