चंद्रपूर दि.28- सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांसाठी कल्याणाच्या विविध योजना राबविण्यात येत असून चंद्रपूर जिल्हयातील 12 हजार 292 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला असून 42 हजार 512 विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हयातील दारिद्रय रेषेखालील लोकांकरीता घरकुल योजना यशस्वीपणे राबविण्यात आली असून ग्रामीण क्षेत्राकरीता 11 हजार 422 व शहरी भागाकरीता 870 असे एकूण 12 हजार 292 घरकुलाचा लाभ दारिद्रय रेषेखालील लोकांना देण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत चंद्रपूर जिल्हयात 8 वस्तिगृहे चालविले जात असून त्यामध्ये 225 विद्यार्थीनी व 450 विद्यार्थी असे एकूण 675 विद्यार्थी वस्तिगृहाचा लाभ घेत आहेत.
शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची महत्वाकांशी योजना सामाजिक न्याय विभागाने राबविली आहे. चंद्रपूर जिल्हयात या योजनेअंतर्गत 42 हजार 512 विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. शासनानी अनुसूचित जातीच्या महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देण्याची योजना राबविली असून या योजनेचे काम जिल्हयात प्रगतीपथावर आहे.
सामाजिक न्याय विभाग चंद्रपूरला या वर्षी अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 42 कोटी 41 लाख 63 हजार इतक्या रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. या निधी मधून विविध विभागामार्फत योजना राबविल्या आहे. यात प्रामुख्यांने अंपग कल्याणाचे खुप मोठे कार्य करण्यात आले. अपंगाच्या संस्थेमध्ये जिल्हयात एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शैक्षणिक सत्र 2012-13 मध्ये 38 हजार 833 विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, 5 हजार 237 विद्यार्थींना सावित्रीबाई शिष्यवृत्ती, 1 हजार 209 विद्यार्थ्यांना शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, 3 हजार 563 विद्यार्थ्याना विद्यावेतन निर्वाह भत्ता, 3 हजार 679 विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क शिष्यवृत्ती व 111 विद्यार्थ्यांना सैनिक शाळा निर्वाह भत्ता वाटप करण्यात आला. तसेच 36 युवक युवतींना सैन्य व पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हयात विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता प्राथमिक व माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालय असलेल्या एकूण 32 आश्रम शाळा असून यात 3 हजार 840 निवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सामाजिक न्याय विभागामार्फत 2 अनुसूचित जाती व नवबौध्द निवासी शाळा असून भिवकुंड येथे 60 मुले तर चिमूर येथे 50 मुली शिक्षणाचा लाभ घेत आहेत.
शैक्षणिक सत्र 2013-14 पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, वस्तिगृह प्रवेश, विद्यावेतन, सैनिक शाळा शिष्यवृत्ती, छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व इतर चार शैक्षणिक योजना ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.
Friday, June 28, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য