সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 27, 2012

शहर बससेवेसाठी आयुक्तांचा पुढाकार


चंद्रपूर, ता. २६ : चंद्रपूर शहरात शहर बससेवेची अनिवार्यता आणि लोकांकडून होत असलेल्या मागणीच्या पाश्र्वभूमीवर मनपाचे आयुक्त प्रकाश बोखड यांनीही आता पुढाकार घेतला आहे. शहरात बीओटी तत्त्वावर बससेवा सुरू करण्यासंदर्भात एसटी महामंडळाचे मत जाणून घेण्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. मनपाच्या अनेक नगरसेवकांनीही बससेवेसाठी अनुकूलता व्यक्त केली आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या आणि व्याप्ती वाढल्याने नागरिकांकडून शहर बससेवेची मागणी होते आहे. एसटी महामंडळाकडून सध्या ऊर्जानगर ते बल्लारपूर यादरम्यान शहर बसेवेची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या सेवेचा दररोज चार हजार नागरिक लाभ घेत असून, महामंडळालाही दररोज दहा ते बारा हजार रुपयांचा नङ्का मिळत आहे. या सेवेची चंद्रपूर शहरात व्याप्ती वाढवावी qकवा मनपाने स्वत: पुढाकार घेऊन शहरात बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. तथापि, यासाठी आतापर्यंत भरीव प्रयत्न केले नसल्याने हा विषय मागे पडला. चंद्रपूर नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा दिल्यानंतर या मागणीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. सुमारे तीन लाख लोकसंख्येचे चंद्रपूर शहर आणि सुमारे ४० ते ५०  किलोमीटर परिघात येत असलेल्या गावांसाठी ही सेवा गरजेची असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होऊ लागले आहे. पंचशताब्दी निधीतून चंद्रपूर शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासोबतच सुमारे दहा ते बारा गावांपर्यंत हद्द वाढविण्याचा मनपाचा प्रस्ताव आहे. या बाबी शहर बससेवेसाठी अनुकूल ठरणाèया आहेत. सुमारे दोन ते अडीच हजार ऑटोंमुळे होणारे प्रदूषण आणि ऑटोप्रवासाचे वाढलेले दर सर्वांसाठीच डोकेदुखी ठरले आहे. या पाश्र्वभूमीवर शहर बससेवेची गरज अधिकच भक्कम मानली जात आहे. मसकाळङ्कने यासंदर्भात पुढाकार घेतल्यानंतर अनेक संघटनांसोबत विद्यार्थी, कर्मचारी यांनीही शहर बससेवेला पाqठबा दिला आहे. मनपाचे आयुक्त प्रकाश बोखड यांनीही जनभावनेचा आदर करीत बससेवेसाठी पुढाकार घेतला आहे. बीओटी तत्त्वावर एसटी महामंडळाचे मत जाणून घेण्यासाठी आयुक्तांनी पत्रव्यवहार केला आहे. खुद्द एसटी महामंडळाने शहर बससेवेसाठी पुढाकार घेतल्यास हा प्रश्न तातडीने सुटू शकतो, असा आशावादही नागरिकांकडून व्यक्त केला जाऊ लागला आहे.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.