महिला अत्याचाराची चर्चा देशभर सुरु असताना चंद्रपुरातही अल्पवयीन मुलीवर बलात्कार -
राजधानी नवी दिल्लीत बस मध्ये झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेने गदारोळ उडाला असताना महिला अत्याचाराबाबत कायदे कडक होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. अशातच चंद्रपुरात एका शाळकरी मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी या प्रकरणी २१ वर्षीय युवकाला ताब्यात घेतले आहे.
चंद्रपूरच्या मित्रनगर भागात आपल्या काकाकडे राहते हि शाळकरी मुलगी. हि मुलगी घरी वादविवाद झाल्याने मानसिक तणावात होती. याच भागात राहणा-या व मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील केळझर गावचा रहिवासी असलेल्या २१ वर्षीय विनीत लाकडे या युवकाने या मुलीला मानसिक आधार देण्याच्या बहाण्याने या युवकाने पिडीत मुलीला आश्रय दिला. या युवकाने तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून सतत अत्याचार केला. दरम्यान मुलीच्या आईने या प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने कारवाई करत विनीत लाकडे या युवकाला अटक केली. आरोपी युवकाविरोधात कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून तपास चालविला जात आहे. महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात त्वरित कारवाई करण्याचे धोरण अवलंबिल्यास गुन्ह्यास आळा बसून आरोपीना कडक शासन होण्यास मदत होणार आहे. कायदे कडक होऊन खटले मर्यादित वेळेत निकाली निघाल्यास कायद्याचा धाक स्थापित होण्यास मदत होणार आहे.